मराठी बातम्या /बातम्या /मनी /ATM, Debit, Credit Card दिसतात सारखे पण वापर वेगवेगळा; तु्म्हाला तिन्ही कार्डमधील फरक माहितीये का?

ATM, Debit, Credit Card दिसतात सारखे पण वापर वेगवेगळा; तु्म्हाला तिन्ही कार्डमधील फरक माहितीये का?

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्डचं काम डेबिड कार्ड करु शकत नाही आणि डेबिट कार्डचं काम क्रेडिट कार्ड करु शकत नाही. या कार्ड्समधील फरक नेमका काय आहे याची माहिती घेऊयात.

मुंबई, 18 जुलै : एटीएम, डेबिड, क्रेडिड कार्ड सगळ्यांनी पाहिलं असेल. अनेकजण ते वापरतातही. तिन्ही कार्ड दिसायला अगदी सारखेच असतात. मात्र तिन्ही कार्डवर मिळणाऱ्या सुविधा भिन्न असतात. या कार्डांमुळे, पैसे काढण्यापासून खरेदी करणे खूप सोपे होते. मात्र क्रेडिट कार्डचं काम डेबिड कार्ड करु शकत नाही आणि डेबिट कार्डचं काम क्रेडिट कार्ड करु शकत नाही. या कार्ड्समधील फरक नेमका काय आहे याची माहिती घेऊयात.

एटीएम कार्ड

एटीएम कार्डचा वापर केवळ एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो. एटीएम कार्ड तुमच्या चालू खात्याशी किंवा बँकेत ठेवलेल्या बचत खात्याशी जोडलेले असते. ते फक्त एटीएम मशिनमध्येच वापरता येते. त्यावर बँक ग्राहकांना कर्ज दिले जात नाही. एटीएम मशीन नसेल तर पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येणार नाही.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ, उच्चांकी दरापेक्षा सोनं आजही 5500 रुपयांनी स्वस्त

डेबिट कार्ड

एटीएम कार्डप्रमाणेच डेबिट कार्डही आहे. यात मास्टरकार्ड, रुपे किंवा व्हिसा यांचा लोगो आहे. हे दोन गोष्टी करते. हे एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि ऑनलाइन पेमेंट आणि डेबिट कार्ड स्वीकारणाऱ्या ठिकाणी व्यवहारासाठी वापरले जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना क्रेडिट कार्डप्रमाणे व्याज द्यावे लागणार नाही.

LIC Jeevan Labh: दररोज फक्त 238 रुपये वाचवा आणि 54 लाख मिळवा; LIC च्या 'ही' योजना माहिती आहे का?

क्रेडिट कार्ड

बँक सर्व ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा देत नाही. तुमच्या खात्यात पैसे नसतानाही क्रेडिट कार्ड वापरून खरेदी, ऑनलाइन पेमेंट आणि इतर खर्च करता येतात. मात्र, यावर व्याज भरावे लागते. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ते वापरता येत नाही, कारण ते बँक खात्याशी जोडलेले नसते. तसेच ऑनलाइन पेमेंटसह, ज्या ठिकाणी रुपे, मास्टर आणि व्हिसा कार्ड स्वीकारले जातात त्या ठिकाणी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

First published:

Tags: ATM, Credit card, Money, Shopping debit card