मुंबई, 18 जुलै: सोन्याच्या दरात मागील आठवड्याच्या घसरणीनंतर आज तेजी दिसून आली. चांदीच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळाली आगे. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही किंचित वाढ झाली आहे. 24 कॅरेटचे शुद्ध सोने आणि 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 50 हजारांच्या पुढे आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत 15 जुलैपासून सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50629 रुपये प्रति तोळे इतका आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 50403 रुपये प्रति तोळेच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 226 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. LIC Jeevan Labh: दररोज फक्त 238 रुपये वाचवा आणि 54 लाख मिळवा; LIC च्या ‘ही’ योजना माहिती आहे का? सोनं आजही उच्चांकी दरापेक्षा 5500 हजारांनी स्वस्त सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 5,571 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदीचे दर आज चांदीचा दर 55574 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 54767 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 807 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. Electricity bill: वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस
कशी तपासाल सोन्याची शुद्धता?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

)







