मुंबई, 18 जुलै : LIC नेहमी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक फायदेशीर योजना चालवते. प्रत्येक योजनेचे काही खासियत असते. प्रत्येकाचे प्रीमियम आणि मॅच्युरिटी फायदे देखील वेगळे असतात. एलआयसीच्या अशाच एका प्लॅनबद्दल आज सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे एलआयसी जीवन लाभ आहे. एलआयसी जीवन लाभ योजना सिक्युरिटी आणि सेव्हिंग दोन्हीचे फायदे देते. ही मर्यादित प्रीमियम भरणारी आणि नॉन-लिंक केलेली योजना आहे. या योजनेत, पॉलिसीधारकाचा मुदतपूर्ती आधी कधीही मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जाते. तसेच हयात असलेल्या पॉलिसीधारकासाठी मुदतपूर्तीनंतर एकरकमी रक्कम दिली जाते. एवढेच नाही तर ही योजना घेतल्यास भविष्यात गरज पडल्यास कर्जाची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. Electricity bill: वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस LIC जीवन लाभ ची वैशिष्ट्ये डेथ बेनिफिट हा या पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा आहे. यामध्ये, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर विमा रक्कम परत केली जाते. मात्र यासाठी पॉलिसी ब्रेक झालेली नसावी आणि सर्व प्रीमियम भरले गेले असावेत. LIC जीवन लाभचा प्रीमियम किती आहे? किमान विमा रक्कम 2,00,000 रुपये आहे, तर कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी पॉलिसीधारकाचे किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 59 वर्षांच्या दरम्यान असावे. 21 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय 54 वर्षे आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी 50 वर्षे आहे. योजनेचे कमाल मॅच्युरिटी वय 75 वर्षे आहे. अतिरिक्त प्रीमियम भरून पॉलिसी अंतर्गत पाच पर्यायी रायडर्स देखील निवडले जाऊ शकतात. पॉलिसीधारक एलआयसीच्या अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ यापैकी एक निवडू शकतो. Monsoon Tips: पावसाळ्यात घराबाहेर जाताना सोबत ठेवा ‘या’ चार गोष्टी, नाहीतर होतील वांदे प्लॅनमध्ये चार पेमेंट पर्याय आहेत. यात 5,000 मासिक, 15,000 त्रैमासिक, 25,000 सहामाही आणि 50,000 वार्षिक अस पर्यात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. जर 25 वर्षांच्या व्यक्तीने 25 वर्षांसाठी ही पॉलिसी खरेदी केली तर त्याची मूळ विमा रक्कम 20 लाख रुपये असेल. त्यानुसार, त्याला वार्षिक 86,954 रुपये किंवा सुमारे 238 रुपये प्रतिदिन प्रीमियम भरावा लागेल. अशाप्रकारे, वयाच्या 50 व्या वर्षी किंवा योजनेच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीचे एकूण मॅच्युरिटी मूल्य 54.50 लाख रुपये असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.