मराठी बातम्या /बातम्या /मनी /डेबिड-क्रेडिट कार्डवर CVV नंबर कशासाठी असतो? याचं काम काय असतं?

डेबिड-क्रेडिट कार्डवर CVV नंबर कशासाठी असतो? याचं काम काय असतं?

ऑनलाइन पेमेंट करताना, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) क्रमांक विचारला जातो, जो कार्ड मेंबरच कार्ड वापरत असल्याची पुष्टी करतो. तो कोणत्याही प्रकारे कार्डचा पिन क्रमांक नाही.

ऑनलाइन पेमेंट करताना, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) क्रमांक विचारला जातो, जो कार्ड मेंबरच कार्ड वापरत असल्याची पुष्टी करतो. तो कोणत्याही प्रकारे कार्डचा पिन क्रमांक नाही.

ऑनलाइन पेमेंट करताना, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) क्रमांक विचारला जातो, जो कार्ड मेंबरच कार्ड वापरत असल्याची पुष्टी करतो. तो कोणत्याही प्रकारे कार्डचा पिन क्रमांक नाही.

मुंबई, 1 ऑगस्ट : डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला तीन अंकी CVV नंबर माहित असेलच. सायबर क्राईम टाळण्यासाठी हे एक अतिशय खास टेक्नोलॉजी असल्याचे बोलले जाते. वाढत्या ऑनलाइन व्यवसायात क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने कॅशलेस व्यवहार अधिक होऊ लागले आहेत. मात्र यामुळे फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. अनेक प्रकरणांमध्ये, कार्ड युजर्सचे मोठे नुकसान देखील झाले आहे.

CVV नंबर काय आहे?

ऑनलाइन पेमेंट करताना, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) क्रमांक विचारला जातो, जो कार्ड मेंबरच कार्ड वापरत असल्याची पुष्टी करतो. तो कोणत्याही प्रकारे कार्डचा पिन क्रमांक नाही. कार्डच्या मागील बाजूस असलेली मॅग्नेटिक स्ट्रिप चिपमध्ये सर्व डेटा असतो. त्‍याच्‍या शेजारी 3 अंक छापलेले असतात, जे केवळ कार्ड यूजरलाच माहित असतात. हा नंबर कोणाशीही शेअर करू नका, असं नेहमी सांगितलं जातं.

रेल्वेमध्ये लांबच्या प्रवासात विंडो सीटवर बसण्याचा अधिकार कुणाला असतो? नियम काय सांगतो तपासा

ऑनलाइन पेमेंटसाठी आवश्यक

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना CVV नंबर कॉपी करता येत नाही. कार्ड डेटामध्ये कोणताही बदल केल्यास, व्यवहार प्रक्रिया पूर्ण होत नाही. क्रेडिट किंवा डेबिट कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर असूनही, व्यवहारादरम्यान CVV क्रमांक भरावा लागतो. उदाहरणार्थ, पेटीएम, फ्रीचार्जमध्ये पेमेंट करण्यासाठी CVV नंबर आवश्यक आहे.

Changes from 1 August : आजपासून कोणते नियम बदलणार? तुमच्यावर काय परिणाम होईल? चेक करा

सतर्क राहा

काही ठिकाणी, कार्ड व्यवहारांसाठी CVV क्रमांक आवश्यक नाही. यादरम्यान सायबर गुन्हेगारांना फसवणूक करण्याची संधी मिळते. याला कार्ड व्हेरिफिकेशन कोड देखील म्हणतात. अमेरिकन एक्सप्रेस कार्ड्सच्या समोर 4 क्रमांकाचा CVV क्रमांक असतो. 1995 मध्ये यूकेच्या मायकेल स्टोनने याचा शोध लावला होता.

First published:

Tags: Credit card, Online fraud, Shopping debit card