मुंबई, 31 जुलै : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होत असतात ज्यांचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होत असतो. जुलै महिना संपून आजपासून ऑगस्ट महिना सुरु होत आहे. आजपासून होणाऱ्या बदलांमध्ये एलपीजी गॅसच्या किमती, बँकिंग प्रणाली, आयकर रिटर्न आणि पीएम किसान इत्यादींचा समावेश आहे. तुमच्यासाठी या बदलांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात महिन्याच्या पहिल्या दिवशी आज व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी आता 1936.50 रुपये मोजावे लागणार आहेत. HDFC च्या होमलोन व्याजदरात वाढ देशातील सर्वात मोठी बँक HDFC ने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करून ग्राहकांना धक्का दिला आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट वाढवला. RPLR हा बेंचमार्क कर्ज दर आहे. तुम्ही त्याला किमान व्याजदर देखील म्हणू शकता. HDFC ने त्यात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. वाढलेले दर आज 1 ऑगस्टपासून लागू होतील. याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय वाढेल आणि त्याचा त्यांच्या मासिक बजेटवर परिणाम होईल. बँक ऑफ बडोदाच्या नियमात बदल बँक ऑफ बडोदाच्या खातेदारांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. बँक 1 ऑगस्टपासून चेकने पैसे देण्याच्या नियमात बदल करत आहे. हे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जात आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल. रेल्वेमध्ये लांबच्या प्रवासात विंडो सीटवर बसण्याचा अधिकार कुणाला असतो? नियम काय सांगतो तपासा पीएम किसानचे केवायसी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या केवायसीसाठी 31 जुलैची वेळ देण्यात आली होती. म्हणजेच महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत. केंद्र सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली होती. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मे होती. पंतप्रधान फसल विमा योजनेची नोंदणी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) चा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नोंदणी करावी लागते. त्याच्या नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै होती. त्यानंतर कोणतीही नोंदणी होणार नाही आणि तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता. कृपया नोंद घ्या की ही नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन केली जाते. ITR Filing: इनकम टॅक भरण्याचा आज शेवटचा दिवस; डेडलाईन चुकल्यास जेलमध्येही जावं लागू शकतं ITR वर दंड ITR भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहेत. यानंतर, 1 ऑगस्टपासून आयटीआर भरण्यावर लेट फी आकारली जाणार आहे. आयकरदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी असल्यास, त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.