Flight Attendants Rules: फ्लाईट अटेंडंटचे काम ऐकून किंवा त्यांना पाहून अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की, फ्लाइट अटेंडंटची नोकरी खूप चांगली आहे आणि त्यांना विमानात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते. बालपणात, अनेकांना वाटते की त्यांना मोठं होऊन एयर होस्टेस व्हायचंय. पण तुम्हाला माहित आहे का की फ्लाइट अटेंडंटची नोकरी जितकी चांगली आहे तितकीच अवघड आहे. विमानांची दुनिया या सिरीजमधून आपण आज फ्लाइंट अटेंडंटच्या नियमांविषयी जाणून घेऊया.
आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य लोक आरामात करू शकतात. परंतु प्रवासादरम्यान फ्लाइट अटेंडंटना त्या गोष्टी करण्याची परवानगी नाही. चला अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या फ्लाइट अटेंडंटना करू देत नाहीत.
हे आहेत नियम :-
-फ्लाइट अटेंडंटना तीव्र वासाचे परफ्यूम घालण्याची परवानगी नाही -तुम्ही फ्लाइट अटेंडंटना खाण्यापिण्याचे पदार्थ देताना पाहिलं असेल, पण त्यांना काहीही खाताना किंवा पिताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल. कारण फ्लाइट अटेंडंटना प्रवाशांसमोर काहीही खाण्याची किंवा पिण्याची परवानगी नाही. त्यांना फक्त काही खास भागात खाण्याची आणि पिण्याची परवानगी आहे. -फ्लाइट अटेंडंट त्यांच्या जागेवर बसले असले तरी त्यांना इअरफोन घालण्याची परवानगी नाही. असं केलं जातं कारण फ्लाइट अटेंडंट विमानात उपस्थित आपत्कालीन सिग्नल ऐकू शकतील. -तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, फ्लाइट अटेंडंटची नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांची उंची चेक केली जाते. उंचीच्या आधारावर भेदभाव करण्यासाठी हे केले जात नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे केले जाते. फ्लाइट अटेंडंटची उंची लहान असेल तर ते कोणत्याही प्रवाशाचे सामान ओव्हरहेड डब्यातून ठेवू शकणार नाहीत किंवा तेथून फर्स्ट एड किट काढू शकणार नाहीत.
Airplanes Facts: फोटोंवरुन समजून घ्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा, एकूण किती दरवाजे असतात?-फ्लाइट अटेंडंटनाही दागिने घालण्याची परवानगी नाही. फ्लाइट अटेंडंटना जड आणि लटकणारे दागिने घालण्याची परवानगी नाही कारण इमर्जन्सी लँडिंगमध्ये इव्हॅक्यूएशन दरम्यान त्यांचे दागिने कुठेतरी अडकले जाण्याची शक्यता असते. ज्यामुळे इव्हॅक्यूएशनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.