Home /News /money /

पंजाब नॅशनल बँकेमध्ये OBC आणि UBI विलीन झाल्यानंतर आता त्यांच्या ग्राहकांच्या ATM कार्डचं काय होणार?

पंजाब नॅशनल बँकेमध्ये OBC आणि UBI विलीन झाल्यानंतर आता त्यांच्या ग्राहकांच्या ATM कार्डचं काय होणार?

Punjab National Bank

Punjab National Bank

PNB ने ट्विट केलेल्या माहितीनुसार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या जुन्या ग्राहकांचा यूजर आयडी बदलण्यात आला आहे. त्याचा या बँकेच्या ग्राहकांच्या डेबिट कार्ड, एटीएम कार्डवर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी ऑगस्ट 2019 मध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये(PNB) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स(OBC) आणि युनियन  बँक ऑफ इंडिया (UBI) विलीन करण्याची घोषणा केली होती. यामुळे आता PNB ही SBI नंतरची देशभरातील दुसरी मोठी बँक ठरणार आहे. विलीनीकरणानंतर जवळपास 17.95 लाख कोटी रुपये इतकी उलाढाल या बँकेची होणार आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी असून या दोन्ही बँकांच्या यशस्वी विलीनीकरणानंतर आता ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराची चिंता लागली आहे. या दोन्ही बँकेतील ग्राहकांची संख्या मोठी असून या ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नसल्याचं पंजाब नॅशनल बँकेने (PNB) म्हटलं आहे. या दोन्ही बँकेच्या ग्राहकांना पंजाब नॅशनल बँक सेवा पुरवणार असून बँकेने ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ट्विटरवर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड (UBI) बॅंकेतिल खातेधारकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये त्यांचा यूजर आयडी आणि एटीएम कार्डसंदर्भातील माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2021 पासून या ग्राहकांचा युजर आयडी, MICR कोड आणि IFSC कोड देखील बदलणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी हा युजर आयडी बदलणे गरजेचे आहे. जर तुम्ही नवीन युजर आयडी(User ID) घेतला नाही तर तुम्हाला इंटरनेट बँकिंग (Internet Banking) ही सुविधा वापरता येणार नाही. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे एटीएम कार्ड बदलण्याची गरज नसून जोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत तुम्ही या एटीएम कार्डच्या(ATM Card) साहाय्याने व्यवहार करू शकता. दोन्ही बँकेच्या एटीएम कार्डधारकांना सध्या कोणत्याही बँकेचे एटीएम मशीन वापरून पैसे काढता येणार आहेत. परंतु कार्डची व्हॅलिडिटी संपल्यानंतर पंजाब नॅशनल बँक या खातेधारकांना त्यांचे एटीएम कार्ड बदलून देणार आहे.

हे देखील वाचा - CBSE 10th-12th Exam 2021 Date Sheet : दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं टाइमटेबल जाहीर

पंजाब नॅशनल बँकेच्या(PNB) देशभरातील 13 हजार एटीएममधून ग्राहक सेवेचा लाभ घेऊ शकणांर असल्याचे देखील बँकेने स्पष्ट केलं आहे. यामुळे विलीनीकरणानंतर ग्राहकांनी कोणत्याही पद्धतीने घाबरून जाण्याचे कारण नसून त्यांच्या सेवा पूर्वीप्रमाणे सुरु राहणार आहेत. एटीएम कार्डप्रमाणेच क्रेडिट कार्डच्या सुविधा देखील पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. क्रेडिट कार्डच्या(Credit Card) नवीन ऑफरसाठी तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडे संपर्क साधू शकता. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पंजाब नॅशनल बॅँकेचे एटीएम आणि सुविधा पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: ATM, Nirmala Sitharaman, Punjab national bank

पुढील बातम्या