जाहिरात
मराठी बातम्या / मनी / UPI किंवा Net Banking करताना चुकीच्या खात्यात पैसे गेले तर...? RBI ची नवीन गाईडलाईन्स जाणून घ्या

UPI किंवा Net Banking करताना चुकीच्या खात्यात पैसे गेले तर...? RBI ची नवीन गाईडलाईन्स जाणून घ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतातच, त्यामुळे UPI वापणं जितकं सोपं आहे, तितकंच लोकांना याबाबत अनेक समस्या देखील उद्भवत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 30 सप्टेंबर : लोक आता डिजीटायजेशनकडे वळले आहेत. ज्यामुळे ते बँकेचं काहीही काम करण्यासाठी डिजीटल सेवेचा वापर करतात. ज्यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि कोणत्याही वेळेत काम करणं शक्य होतं. त्यात कोरोनाकाळानंतर तर लोकांनी UPI आणि नेट बँकिंगचा वापर करणं मोठ्या प्रमाणावर सुरु केलं आहे. ज्यामुळे तुम्ही कुठूनही कोणालाही पैसे पाठवू शकता. UPI चा व्यवहार करण्यासाठी सोप आहे आणि यामुळे हिशोब ठेवणं देखील सोपं होतं, ज्यामुळे अगदी भाजी वाल्यांपासून ते दुधवाले, हॉटेल, सगळेच लोक याचा वापर करु लागले आहेत. UPI मुळे लोकांचं जीवन सोपं झालं आहे, यामुळे पैसे सोबत ठेवण्याची देखील लोकांना गरज नाही. परंतू प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतातच, त्यामुळे हे जितकं सोपं आहे, तितकंच लोकांना याबाबत अनेक समस्या देखील उद्भवत आहे. हे वाचा : SBI च्या या 6 टिप्स आहेत खूप उपयोगी, UPI व्यवहारात होणार नाही फसवणूक जसं की UPI आणि नेट बँकिंग करताना कधीकधी चुकीचा नंबर टाकल्यामुळे दुसऱ्याच्या खात्यात पैसे जातात आणि बऱ्याच लोकांसोबत हे घडलं देखील आहे. पण अशावेळेला काय करावं हे बहुतांश लोकांना ठावूक नसतं, ज्यामुळे त्यांचे पैसे जातात आणि त्यांना आपली फसवणूक झाल्यासारखी वाटते. अशा वेळी काय करायचं? चला जाणून घेऊ आरबीआयने नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर कधी चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्यास, 48 तासांच्या आत ते पैसे परत केले जाऊ शकतात. UPI आणि नेट बँकिंग केल्यानंतर स्मार्टफोनवर आलेला मेसेज कधीही डिलीट करू नका. या संदेशात PPBL क्रमांक येतो, जो तुमचे पैसे परत मिळवसाठी महत्वाचा असतो. हे वाचा : RBI च्या निर्णयामुळे गृह आणि कार कर्जाचा EMI किती वाढेल? समजून घ्या गणित काय आहे RBI ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे? - RBI ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार तुमचे पैसे 48 तासांच्या आत परत करणे ही बँकेची जबाबदारी आहे. जर बँकांनी पैसे परत मिळण्यास मदत केली नाही, तर ग्राहक bankingombudsman.rbi.org.in वर तक्रार करू शकतात. - जर चुकून पैसे कोणी दुसऱ्याच्या खात्यात गेले तर त्यासाठी बँकेला पत्र लिहून द्यावे लागेल. यामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव आणि ज्या खात्यात पैसे गेलेयत तो क्रमांक लिहावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही बँकेतून परतावा घेऊ शकता 1. चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर, सर्वप्रथम, तुमच्या बँकेला कॉल करा आणि सर्व माहितीसह मेसेजवरी PPBL नंबर देखील त्यांना द्या 2. यानंतर बँकेत जा आणि तेथे तुमची तक्रार नोंदवा. 3. बँकेतील मॅनेजरला लेटर लिहा. 4. या लेटरमध्ये चूकून पैसे गेलेले खाते क्रमांक लिहा आणि तुम्हाला ज्या खाते क्रमांकावर पैसे पाठवायचे आहेत त्याचीही माहिती द्या. 5. व्यवहाराचा संदर्भ क्रमांक, व्यवहाराची तारीख, रक्कम आणि IFSC कोड लिहिणे फार महत्वाचे आहे.

News18लोकमत
News18लोकमत

UPI, Net banking करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या UPI आणि नेट बँकिंग करताना नेहमीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. UPI करत असताना तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात त्याचे नाव आणि खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करा. QR कोडद्वारे UPI करत असताना, दुकानदाराला त्यांचे नाव विचारा आणि तुम्ही ज्याला पैसे पाठवत आहात तो योग्य खाते क्रमांक असल्याची खात्री करून त्या दोघांना एकत्र करा. कधीही नेट बँकिंग करताना घाई करू नका. नेट बँकिंग आणि UPI केल्यानंतर मिळालेला मेसेज सेव्ह करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात