मुंबई, 29 सप्टेंबर: स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी 6 टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीनं UPI व्यवहार सुरक्षित केले जाऊ शकतात. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँकेनं हे पाऊल उचललं आहे. 2016 मध्ये सुरू झालेला UPI आजपर्यंतचा सर्वात विश्वासार्ह व्यवहार पर्याय म्हणून उदयास आला आहे. कोविड महामारीच्या काळात UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आणि यामध्ये सतत वाढत आहे. पण यामध्ये फसवणूक होण्याचा धोकाही आहे, यापासून बचाव करण्यासाठी एसबीआयनं खास टिप्स दिल्या आहेत.
- या टिप्सबद्दल SBI नं एक ट्विट जारी केलं आहे. UPI पेमेंट करताना सावध राहणं किती महत्त्वाचं आहे हे ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे. यासाठी एसबीआयनं 6 टिप्स सांगितल्या आहेत.
- कोणाकडूनही पैसे घेण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. म्हणजेच UPI पिन हा नेहमी पैसे देण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी असतो आणि पैसे स्वीकारण्यासाठी त्याची गरज नसते. आजकाल पैसे घेण्याच्या नावाखाली UPI पिन विचारला जातो आणि फसवणूक केली जाते.
- तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात त्याची पडताळणी देखील आवश्यक आहे. यामुळं तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जाण्यापासून वाचतील. ही पडताळणी खूप सोपी आहे आणि ते करण्यासाठी काही सेकंदात सत्यापित होते. तुम्ही तुमच्या UPI अॅपवर त्या व्यक्तीचा UPI पत्ता टाकताच, त्याची वेरिफिकेशन उघड होईल. तुमच्या फोनच्या स्क्रीनवर वेरिफाइड खातं लिहिलेलं दिसेल. हे तुम्हाला प्राप्तकर्त्याबद्दल माहिती देईल.
हेही वाचा: स्टेशन, मॉल किंवा एअरपोर्टवर फोन चार्ज करताना सावधान! एका महिलेचे दीड लाख गायब
- पडताळणी केल्याशिवाय कोणतीही पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका. कदाचित कोणीतरी तुम्हाला सुरुवातीला आमिष दाखवून पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असेल. यामध्ये नंतर तुम्हाला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला पैसे पाठवणारी व्यक्ती योग्य आहे की नाही याची माहिती न मिळाल्यानं किंवा गुन्हेगारी प्रतिमा असलेली व्यक्ती आणि पैसे गोळा करण्याची विनंती स्वीकारल्यानं नंतर त्रास होऊ शकतो.
- तुमचा UPI पिन प्रत्येकाला दाखवू नका. तुमचा UPI पिन स्वतःकडे ठेवणं सर्वात महत्वाचं आहे. पिन कोणताही असो, तो अतिशय सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पिन लीक करणं म्हणजे तुमच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. म्हणून कुटुंबात तुम्ही ज्याला सर्वात विश्वासू मानता त्याला तुमचा पिन सांगा. एटीएम किंवा डेबिट कार्ड पिनसाठी देखील काळजी घेतली पाहिजे.
- जर तुम्ही क्यूआर कोड असलेल्या एखाद्याला पैसे दिले तर प्रथम त्या व्यक्तीचे तपशील तपासा. तुम्ही ATM आणि डेबिट कार्ड पिन प्रमाणे UPI पिन बदलत राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.