नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : बँकेची अनेक कामं ऑनलाईन होत आहेत. मात्र, आता बँकेत जाण्याची गरजच पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन केले. त्यामुळे आता बँक आणि ग्राहकांमधील अंतर आणखी कमी होणार आहे. या सेवेद्वारे, तुम्हाला बँकेत खाते उघडण्यासाठी आणि कर्ज अर्जापासून ते बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. कारण या सर्व सुविधा डिजिटल बँकिंग युनिटवर उपलब्ध होणार आहेत. डिजिटल बँकिंग युनिटच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही सेवा आधुनिक भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. या डिजिटल बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सोप्या होणार आहेत. यामुळे खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये पैसे पाठवण्यापासून कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोपे होईल. डिजिटल बँकिंग युनिट म्हणजे काय? डिजिटल बँकिंग युनिट हे एक केंद्र आहे, जिथे बँकिंग उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. येथे ग्राहकांना डिजिटल व्यवहार करणे सुरक्षित आणि सोपे होईल. या युनिट्समध्ये सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध असतील आणि तुम्हाला त्यांच्यासाठी नेहमी बँकेत जाण्याची गरज नाही. डिजिटल बँकिंग युनिट कसे काम करेल? ICICI बँकेच्या निवेदनानुसार, डिजिटल बँकिंग युनिटमध्ये दोन वेगळे झोन असतील - एक सेल्फ-सर्व्हिस एरिया आणि एक डिजिटल असिस्टंट झओन. सेल्फ सर्व्हिस झोनमध्ये एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि मल्टी फंक्शनल किओस्क असेल जे पासबुक प्रिंटिंग, इंटरनेट बँकिंगसह अनेक सेवा प्रदान करेल. आयसीआयसीआय बँकेने सांगितले की एक डिजी शाखा किओस्क असेल, जी मोबाईल बँकिंग अॅपवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा प्रदान करेल. हा झोन एक डिजिटल इंटअॅक्टिव स्क्रीन प्रदान करेल जिथे ग्राहक उत्पादन ऑफर आणि आवश्यक सेवांसाठी चॅटबॉट्सद्वारे संवाद साधू शकतात. वाचा - ऑनलाइन खरेदी करताना सावधान! काळजी न घेतल्यास बसेल भुर्दंड त्याच वेळी, एचडीएफसी बँकेचे डिजिटल बँकिंग युनिट इंटअॅक्टिव एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, इंटअॅक्टिव डिजिटल वॉल, नेट बँकिंग किओस्क/व्हिडिओ कॉल आणि टॅब बँकिंग सेवा देईल. बहुतेक सेवा सेल्फ-सर्व्हिस मोडमध्ये असतील. ज्या चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. तर दोन बँक कर्मचार्यांनी चालवल्या जाणार्या डीबीयूमध्ये एक असिस्टंट क्षेत्र देखील असेल.
पब्लिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचेही DBU सरकारच्या या उपक्रमात देशातील 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 12 खाजगी क्षेत्रातील बँका आणि एक लघु वित्त बँक सामील होत आहेत. या मालिकेत ICICI बँकेने रविवारी उत्तराखंडमधील डेहराडून, तामिळनाडूमधील करूर, नागालँडमधील कोहिमा आणि पुद्दुचेरी येथे चार डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) सुरू करण्याची घोषणा केली. जन स्मॉल फायनान्स बँकेने बिहटा, बिहार आणि बेरो, झारखंड येथे DBU लाँच केले आहेत. HDFC बँकेने हरिद्वार, चंदीगड, फरीदाबाद आणि दक्षिण 24 परगणा, पश्चिम बंगाल येथे डिजिटल बँकिंग युनिट्स देखील सुरू केली आहेत.