मुंबई, 15 ऑक्टोबर : दिवसेंदिवस ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत आहे. आता अगदी ग्रामीण भागातील लोकंही घरबसल्या जगभरातील वस्तू मागवत आहेत. मात्र, हे खरेदी करताना किती काळजी घेतली पाहिजे हे पुढच्या उदाहरणावरुन लक्षात येईल. एका व्यक्तीने नवीन कंपनीने लॉन्च केलेला मोबाइल फोन ऑनलाइन पोर्टलद्वारे पूर्ण पैसे देऊन खरेदी केला. फोनचे फीचर्स, त्याची किंमत, एकत्रितपणे पूर्ण पेमेंट करण्यावर मिळणारी सवलत आणि युजर्सचे रिव्ह्यू वाचूनच त्याने फोन घेतला. दोन दिवसातच त्यात काही अडचणी येऊ लागल्या. जिथून फोन घेतला होता त्या ऑनलाइन पोर्टलवर त्याने तक्रार केली. तेथे त्याला सांगण्यात आले की हा फोन ज्या ब्रँड कंपनीचा आहे त्या कंपनीकडे तक्रार करावी लागेल. अशा प्रकारे 10 दिवस उलटूनही फोन बदलून मिळाला नाही. ऑनलाइन शॉपिंगबाबत अशी प्रकरणे रोजच समोर येत आहेत.
दिवाळी सण काही दिवसांवर असल्याने एका अंदाजानुसार, भारतात दिवाळीच्या आसपास सुमारे 5 कोटी भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. याचा मोठा भाग ऑनलाइन शॉपिंगद्वारे केला जातो. अशा स्थितीत ऑनलाइन शॉपिंग करताना येणाऱ्या अडचणींबाबत अगोदरच खबरदारी आणि काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल सांगतात की, ऑनलाइन पोर्टलवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या रिटर्न पॉलिसीमध्ये लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा खरेदीदार किंवा ग्राहक एखादे उत्पादन घेताना, उत्पादनाची किंमत, वैशिष्ट्ये, रिव्ह्यू, गुणवत्ता यासंबंधी सर्व माहिती वाचतो. मात्र, बारीक अक्षरात लिहिलेल्या अटी आणि नियम नीट वाचत नाही. ज्याचा ऑनलाइन पोर्टल्स फायदा घेतात.
प्रवीण सांगतात की, जर उत्पादन स्वस्त असेल, तर अनेक वेळा लोक त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करतात. रिटर्न प्रक्रियेतून जाण्यासाठी लागणारा वेळ आणि डोकेदुखी लक्षात घेऊन, ते तसेच ठेवतात. जर प्रॉडक्ट महाग असेल तर ते रिटर्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतरही 100% रिफंड मिळेलच याची गॅरंटी नाही. या समस्यांमुळे काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने काही ऑनलाइन पोर्टलवर मोठा दंडही ठोठावला होता. मात्र, खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वाचा - नशीब म्हणतात ते हेच का? कर्जाच्या थकबाकीची नोटीस आली अन् लागली लॉटरी
ऑनलाइन खरेदी करताना काय खबरदारी घ्याल?
कोणतेही उत्पादन ऑनलाइन खरेदी करताना त्याची सखोल तपासणी करा.
तुम्ही ज्या पोर्टलवरून ब्रँडचे उत्पादन खरेदी करत आहात ते विश्वसनीय आहे की नाही हे तपासण्यासाठी, त्याच्या लिंकवर http ऐवजी https असेल तरच पुढे जा. म्हणजेच, त्यात s असणे आवश्यक आहे जे सुरक्षा दर्शवते.
कोणत्याही उत्पादनाचे वर्णन म्हणजे टर्म आणि अटी नीट वाचा. जेणेकरुन दाखवलेल्या वस्तूंपेक्षा माल आवडत नसेल किंवा वेगळा असेल तर तो परत करायला हरकत नाही.
ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घ्या, संपूर्ण प्रक्रिया समजून घेतल्यानंतरच पेमेंट करा.
ऑनलाईन ऑर्डर केलेला माल डिलिव्हरी बॉयसमोर ओपन करा आणि डिलिव्हरी बॉयसोबत सामानाचा फोटो काढा, जेणेकरुन प्रोडक्ट ऐवजी दुसरे काही आले तर किंवा काही अडचण आल्यास तक्रार करता येईल.
ग्राहक येथे तक्रार करू शकतात?
प्रवीण खंडेलवाल सांगतात की, देशातील अनेक ग्राहकांना सीसीपीएबाबत माहिती नाही. येथे येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जात आहे. एखाद्या ग्राहकाला वस्तू सदोष आढळल्यास किंवा जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या वस्तूंपेक्षा भिन्न वस्तू, गुणवत्तेत किंवा प्रमाणामध्ये कमतरता आढळल्यास किंवा चुकीची माहिती प्रदान केली असल्यास किंवा ऑनलाइन पोर्टल किंवा ब्रँड कंपनी ती परत करत नसल्यास किंवा परतावा दिला जात नाही. अशा परिस्थिती ग्राहक विलंब न करता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला म्हणजेच भारत सरकारच्या CCPA ccpa@nic.in वर तक्रार करू शकतात. किंवा तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1800114000 वर तक्रार करू शकता. CCPA ला पाठवलेल्या ईमेलवर लगेच कारवाई केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Online shopping