मुंबई, 2 ऑक्टोबर: तुम्ही कधी विचार केला आहे का की काही स्टार्टअप्सना युनिकॉर्न का म्हटलं जातं? युनिकॉर्न स्टार्टअप्स होण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करावी लागते?
युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय?
युनिकॉर्न हा भांडवल उद्योगात वापरला जाणारा एक लोकप्रिय शब्द आहे व्हेंचर कॅपिटल इंडस्ट्रीमध्ये ज्या खासगी मालकीच्या कंपनीचे बाजारमूल्य 1 अब्ज डॉलर म्हणजेच 7000 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे अशा कंपनीला युनिकॉर्न स्टार्टअप म्हंटले जाते.
युनिकॉर्न शब्दाचा उगम :
हा शब्द प्रथम काउबॉयच्या संस्थापक आयलीन ली यांनी 2013 मध्ये केला होता जेव्हा युनिकॉर्न म्हणून $1 बिलियन पेक्षा जास्त मूल्य असलेल्या 39 स्टार्टअप्सचा उल्लेख केला होता. हा शब्द सुरुवातीला अशा स्टार्टअप्सच्या दुर्मिळतेवर जोर देण्यासाठी वापरला जात असे. तेव्हापासून युनिकॉर्न स्टार्टअपची व्याख्या कधी बदलली नाही. मात्र,युनिकॉर्नची संख्या वाढली आहे.
डेकाकॉर्न ( सुपर युनिकॉर्न):
- 10 अब्ज डॉलर्सच्या मूल्यापेक्षा जास्त असलेल्या स्टार्टअप्सना डेकाकॉर्न ( सुपर युनिकॉर्न) म्हणून संबोधले जाते.
- ड्रॉपबॉक्स, स्पेसएक्स आणि वीवर्क ही डेकाकॉर्नची काही उदाहरणे आहेत. आतापर्यंत, जगभरातील 46 कंपन्यांनी डेकाकॉर्नचा दर्जा प्राप्त केला आहे. भारतात Flipkart, BYJU’s, Nykaa आणि Swiggy असे चार स्टार्टअप आहेत,जे डेकाकॉर्न स्टार्टअप आहेत.
- कॅनडा या देशामधील स्टार्टअप्ससाठी, आपण ज्याला युनिकॉर्न म्हणतो त्याला एक विशेष संज्ञा आहे. ते म्हणजे ‘नरव्हाल’ (narwhal)
- म्हणजे कोणत्याही कॅनेडियन स्टार्टअप कंपनीचे मूल्य $1 बिलियन पेक्षा जास्त आहे तिला ‘नरव्हाल’ (narwhal) म्हणतात.
**हेही वाचा:** स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना अलर्ट! या नंबरवरुन कॉल तर आला नाही? लगेच चेक करा
- Hootsuite आणि Wattpad ही नरव्हाल कंपन्यांची दोन उदाहरणे आहेत.
- तंत्रज्ञानाचा उच्च वापर ,उत्पादनांमध्ये नाविन्य आणि ग्राहकांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे ही युनिकॉर्न स्टार्टअपची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत
- ह्या वर्षीच्या मे मध्ये भारतात शंभराव्या स्टार्टअप चा जन्म झाला. Neobank स्टार्टअप युनिकॉर्न क्लब मध्ये समाविष्ठ झाला. भारत सध्या युनिकॉर्न स्टार्टअप च्या संख्येत जगात तिसऱ्या नंबरवर येतो आतापर्यंत,भारतात 107 युनिकॉर्न आहेत ज्यांचे एकूण मूल्य 340.79 बिलियन डॉलर आहे. 2021, 2020 आणि 2019 या वर्षात अनुक्रमे 44, 11 आणि 7 युनिकॉर्नसह जास्तीत जास्त युनिकॉर्नचा जन्म झाला.
भारतातील पहिलं युनिकॉर्न:
InMobi 2011 मध्ये भारतातील पहिले युनिकॉर्न बनले. या adtech स्टार्टअपची स्थापना 2007 मध्ये नवीन तिवारी, मोहित सक्सेना, अमित गुप्ता, अभय सिंघल यांनी केली.
2022 मधील आतापर्यंतची युनिकॉर्न स्टार्टअप-
2021 मधील युनिकॉर्न स्टार्टअप-
2020 मधील युनिकॉर्न स्टार्टअप-
2019 मधील युनिकॉर्न स्टार्टअप-