जाहिरात
मराठी बातम्या / मनी / स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना अलर्ट! या नंबरवरुन कॉल तर आला नाही? लगेच चेक करा

स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना अलर्ट! या नंबरवरुन कॉल तर आला नाही? लगेच चेक करा

स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना अलर्ट! या नंबरवरुन कॉल तर आला नाही? लगेच चेक करा

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 ऑक्टोबर : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट मेसेज जारी केला आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना 2 मोबाईल नंबरबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. हे क्रमांक फिशिंगसाठी वापरले जात असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. या क्रमांकांवरून पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास बँकेने सक्त मनाई केली आहे. आसाम सीआयडीने या क्रमांकांबद्दल सर्वप्रथम इशारा दिला होता. सीआयडीने ट्विटमध्ये लिहिले की, “एसबीआय ग्राहकांना 2 नंबरवरून कॉल येत आहेत जे त्यांना केवायसी अपडेट करण्यासाठी फिशिंग लिंकवर क्लिक करण्यास सांगत आहेत. सर्व एसबीआय ग्राहकांना विनंती आहे की अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. बँकेने ट्विटला दिला दुजोरा एसबीआय बँकेनेही या ट्विटची पुष्टी केली असून आपल्या ग्राहकांना फोन न उचलण्यास आणि केवायसी अप डेट लिंकवर क्लिक न करण्यास सांगितले. बँकेने केवळ कॉलवरच नव्हे तर एसएमएस, ईमेल इत्यादींवरील अशा लिंक्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. वाचा - Pan Card : तुम्हीही चुकून बनवली 2 पॅनकार्ड, लगेच करा हे काम, अन्यथा होईल जेल! ही माहिती कोणाशीही शेअर करू नका तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी यांसारखे क्रमांक कोणाशीही शेअर करू नका. या गोष्टींची विशेष काळजी घ्या याशिवाय एसबीआय, आरबीआय, सरकार, कार्यालय, पोलिस आणि केवायसी प्राधिकरणाच्या नावाने फोन कॉल्सपासून सावध रहा. याशिवाय फोनवरील कोणतेही अॅप किंवा तुमच्या फोनवरील कोणत्याही अज्ञात स्रोताद्वारे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. अनोळखी लोकांनी पाठवलेल्या मेल्स आणि मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. याशिवाय तुम्हाला सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोनवर मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बनावट ऑफरपासून सावध रहा.

News18लोकमत
News18लोकमत

ही चूक नका याशिवाय बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक ठेवल्यास किंवा त्याचे फोटो मोबाईलमध्ये ठेवल्यानेही तुमची माहिती लीक होण्याचा धोका असल्याचे बँकेने म्हटले आहे. यासोबतच तुमचे खातेही पूर्णपणे रिकामे होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sbi alert
  • First Published :
जाहिरात
जाहिरात