जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Elon Musk यांच्या एक्स गर्लफ्रेन्डने गिफ्ट्सचा केला लिलाव, मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या निर्णयातून करोडोंची कमाई

Elon Musk यांच्या एक्स गर्लफ्रेन्डने गिफ्ट्सचा केला लिलाव, मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या निर्णयातून करोडोंची कमाई

Elon Musk यांच्या एक्स गर्लफ्रेन्डने गिफ्ट्सचा केला लिलाव, मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या निर्णयातून करोडोंची कमाई

मस्क आणि जेनिफरचा एक फोटो 42000 डॉलरमध्ये विकला गेला आहे. मस्क यांनी जेनिफरला बू बू म्हणत वाढदिवसाचे कार्ड दिले आणि त्यावर स्वाक्षरीही केली, जे सुमारे 17,000 डॉलरमध्ये विकले गेले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कची एक्स गर्लफ्रेंड जेनिफर गया ही आपल्या प्रेमाची निशाणी विकून करोडपती बनली आहे. जेनिफरने इलॉन मस्कसोबतच्या तिच्या जुन्या फोटोंचा लिलाव केला आहे. जेनिफरकडे तिचे आणि इलॉन मस्क यांचे अनेक फोटो होते, जे विकून जेनिफरने $1.65 लाख कमावले आहेत. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये 1.3 कोटी इतकी आहे. नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका लिलावात जेनिफरने या फोटोंचा लिलाव केला. लिलाव कंपनीने म्हटले आहे की जेनिफर आणि मस्क यांचे हे कलेक्शन अशा फोटोचे आहे जे आजपर्यंत कुठेही पाहिलेले नाही. यासोबतच इलॉन मस्क यांनी आपल्या एक्स गर्लफ्रेंडला दिलेल्या गिफ्ट्सचाही लिलाव करण्यात आला आहे. त्या भेटवस्तूंमध्ये या फोटोचाही समावेश आहे. गूगलच्या चुकीमुळे व्यक्ती रातोरात बनला करोडपती, खात्यात अचानक जमा झाली मोठी रक्कम; पुढे काय झालं? एलोन मस्क आणि जेनिफरने 1994-95 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. यावेळी दोघांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात शिक्षण घेतले. मस्क यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि जेव्हा ते कॅलिफोर्नियाला आले तेव्हा त्यांनी जेनिफरसोबतचे संबंध तोडले. इलॉन मस्क आणि जेनिफर यांच्या डेटिंगच्या काळात अनेक भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. याचा लिलाव करणार्‍या कंपनीने माहिती दिली आहे की इलॉन मस्कची मैत्रीण जेनिफरने 1994 मध्ये मस्क यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या भेटवस्तूचाही लिलाव केला आहे. एक लहान सोन्याचा हार लिलावात 51,000 डॉलरमध्ये विकला गेला आहे. एक क्लिक तुमचे सर्व पैसे उडवू शकतो! ऑनलाईन बँकींग सेवा वापरणाऱ्यांना सरकारचा मोठा इशारा मस्क आणि जेनिफरचा एक फोटो 42000 डॉलरमध्ये विकला गेला आहे. मस्क यांनी जेनिफरला बू बू म्हणत वाढदिवसाचे कार्ड दिले आणि त्यावर स्वाक्षरीही केली, जे सुमारे 17,000 डॉलरमध्ये विकले गेले. जेनिफर आता दक्षिण कॅरोलिनामध्ये राहते. तिने सांगितले की ती आपल्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी काही पैसे जमवण्याचा विचार करत आहे आणि त्याअंतर्गत तिने जुन्या भेटवस्तूचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात