जाहिरात
मराठी बातम्या / मनी / गूगलच्या चुकीमुळे व्यक्ती रातोरात बनला करोडपती, खात्यात अचानक जमा झाली मोठी रक्कम; पुढे काय झालं?

गूगलच्या चुकीमुळे व्यक्ती रातोरात बनला करोडपती, खात्यात अचानक जमा झाली मोठी रक्कम; पुढे काय झालं?

Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न

Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न

हॅकर सॅम करी यांनी सांगितले की, सुमारे 3 आठवड्यांपूर्वी गुगलने मला 2.5 कोटी डॉलर्स पाठवले होते. ट्विटरवर याबाबत माहिती देताना या हॅकरने स्वत:ला मिळालेल्या रकमेशी संबंधित एक छायाचित्रही शेअर केले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 18 सप्टेंबर: जगातील आघाडीची टेक फर्म गुगलची एक मोठी चूक समोर आली आहे. कंपनीने अनवधानाने गेल्या महिन्यात 2.5 कोटी यूएस डॉलर हॅकरला ट्रान्सफर केले. भारतीय रुपयानुसार ही रक्कम सुमारे 2 कोटी आहे. सॅम करी नावाच्या या हॅकरला गुगलकडून हे पैसे का मिळत आहेत याची कल्पना देखील नव्हती. हॅकर सॅम करी यांनी सांगितले की, सुमारे 3 आठवड्यांपूर्वी गुगलने मला 2.5 कोटी डॉलर्स पाठवले होते. ट्विटरवर याबाबत माहिती देताना या हॅकरने स्वत:ला मिळालेल्या रकमेशी संबंधित एक छायाचित्रही शेअर केले आहे. न्यूजवीकनुसार, सॅम करी ओमाहामध्ये कर्मचारी सुरक्षा अभियंता आहे. सॅमने सांगितले की तो सिस्टम आणि सॉफ्टवेअरमध्ये बग शोधण्याचे काम करतो आणि यासाठी अनेक कंपन्यांनी रोख बक्षिसे दिली आहेत. या रकमेचा भूतकाळात केलेल्या कामाशी काहीही संबंध नसला तरी त्यांनी गुगलसाठी ‘बग बाउंटी हंटिंग’चे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक क्लिक तुमचे सर्व पैसे उडवू शकतो! ऑनलाईन बँकींग सेवा वापरणाऱ्यांना सरकारचा मोठा इशारा

गुगलने याला दुजोरा देताच या सस्पेन्सवरचा पडदा उठला आणि पैशाचे हे पेमेंट चुकून झाले आणि त्याचे श्रेय मानवी चुकांना दिले गेले. गूगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या टीमने अलीकडेच चुकीच्या पार्टीला पेमेंट ट्रान्सफर केले आणि हे सर्व चुकून घडले. ज्याने आम्हाला याबद्दल सांगितले त्या व्यक्तीचे आम्ही कौतुक करतो. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकजण एक चूक करतात! मग खिसा होतो रिकामा, आत्ताच सावध व्हा दुसरीकडे हॅकर सॅम करी यांनी गुगलकडून मिळालेल्या 2 कोटी रुपयांच्या रकमेतून एक पैसाही खर्च केला नसल्याचे सांगितले. कारण कंपनीला आपली चूक कळली असून त्यांना पैसे परत करावे लागले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात