मराठी बातम्या /बातम्या /मनी /पर्सनल लोन वेळेत फेडलं नाही? भोगावे लागतील वाईट परिणाम, आताच घ्या दखल!

पर्सनल लोन वेळेत फेडलं नाही? भोगावे लागतील वाईट परिणाम, आताच घ्या दखल!

कर्जाच्या कचाट्यात सापडलाय का? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

कर्जाच्या कचाट्यात सापडलाय का? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

तुमच्याही बाबतीत असा प्रकार घडत असेल तर याबाबत वेळीच दक्ष व्हा. कारण तुम्ही दिलेल्या कालावधीत पर्सनल लोन फेडलं नाही तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : मुलांचं शिक्षण, गृहखरेदी, कारखरेदी यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण आर्थिक नियोजन करत असतो. एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जवळ पुरेसे पैसे असावेत यासाठीदेखील आपण पैशाची तजवीज करून ठेवतो. पण काहीवेळा पैशांची गरज, घराची दुरूस्ती, वाहनखरेदी किंवा लग्नाचा खर्च यांसारख्या तातडीच्या गोष्टीसाठी आपल्याला कर्जाची गरज भासते. अशावेळी आपण ‘पर्सनल लोन’चा पर्याय निवडतो. आजकाल अनेक सरकारी, खासगी तसेच सहकारी बॅंका आणि वित्तीय संस्था पर्सनल लोन देतात. मात्र यासाठी व्याजदर वेगवेगळा असतो. काहीवेळा आपल्याला कर्जाची परतफेड काहीशी अवघड होतं. दरमहा ईएमआय भरणं शक्य होत नाही. तुमच्याही बाबतीत असा प्रकार घडत असेल तर याबाबत वेळीच दक्ष व्हा. कारण तुम्ही दिलेल्या कालावधीत पर्सनल लोन फेडलं नाही तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

  कोणतीही बॅंक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला पर्सनल लोन देताना तुमची क्षमता, भांडवल, स्थिती, अतिरिक्त गोष्टी आणि आर्थिक स्थिती पाहून तुम्हाला पर्सनल लोन देते. तसंच तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड करण्यात सक्षम आहात, यासंबंधी खात्री झाल्यावर कर्ज दिलं जातं. पर्सनल लोनचे निकष पूर्ण केल्यानंतर आणि कागदपत्रं सबमिट केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या कालावधीत तुम्हाला या कर्जाची परतफेड करणं गरजेचं असतं. दर महिन्याला निश्चित केलेल्या तारखेला तुम्ही ईएमआय भरणं गरजेचं असतं. पण काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही पर्सनल लोनसाठीचा ईएमआय भरू शकला नाहीत तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

  दिलेल्या कालावधीत पर्सनल लोनची परतफेड झाली नाही, दरमहा ईएमआय दिला गेला नाही तर तुमच्या कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर कर्जदार 90 दिवसांपेक्षा जास्त काळ डिफॉल्ट राहिला तर पर्सनल लोनचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट म्हणून केले जातं. 180 दिवसांनंतरही कर्जाची फरतफेड झाली नाही तर संबंधित कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कर्ज देणाऱ्या संस्थेस असतो. यासंबंधी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कर्जदारास दोन रिमाईंडर आणि रिकॉल लेटर पाठवण्याचा पर्याय कर्ज देणारी संस्था निवडते. रिकॉल लेटर हे अंतिम स्मरणपत्र असतं. त्यात विशिष्ट तारखेपर्यंत थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाईसंदर्भात उल्लेख असतो. कर्ज देणाऱ्या संस्थेस कर्जदारावर थकबाकीप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असला तरी काही गोष्टी कर्जदार नक्कीच करू शकतो.

  यात प्रकरणातील तथ्ये जाणून घेणं, प्रतिपक्षाचे आरोप समजून घेणं, मालमत्ता कोणत्या किंमतीला विकली जात आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार, आपलं मत देण्याच अधिकार, सन्मानाने वागणूक मिळण्याचा अधिकार,मालमत्तेच्या विक्रीच्या रकमेसह थकबाकी दायित्व विनियोग केल्यानंतर अवशिष्ट मूल्याचे अधिकार कर्जदाराला मिळतात. मात्र कर्जदाराने निधी वळवला असेल, कर्जाची परतफेड जाणूनबुजून टाळली असेल तसेच कर्ज देणाऱ्या संस्थेला माहिती न देता तारण विकले असेल तर अशा कर्जदाराविरोधात फौजदारी खटला दाखल होऊ शकतो. पण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसल्यास कर्जदाराने कर्ज देणाऱ्या संस्थेला वैध कारणे दिली तर कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी पर्याय मिळू शकतात.

  पुन्हा EMI आणि होम लोन वाढणार? RBI ची आज महत्त्वपूर्ण बैठक

  कर्जाच्या उर्वरित कालावधीत तुम्हाला दंडासह एकूण देय रक्कम भरावी लागते. कोणत्याही कर्जदारासाठी क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर भविष्यात कोणत्याही प्रकारचं कर्ज सहज मिळतं. जर तुम्ही एका ईएमआय पेमेंटवर डिफॉल्ट केले तर तुमचा क्रेडिट स्कोअर झटकन कमी होतो आणि यामुळे तुमच्या भविष्यातल्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

  जर तुम्हाला पर्सनल लोनची परतफेड करण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. दरमहा काही रक्कम ईएमआय भरण्यासाठी बाजूला ठेवणे, अतिरिक्त किंवा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम ईएमआयसाठी वापरणे या गोष्टी करू शकता. कर्ज फेडण्यात अडचणी असतील तर त्याची कारणं कर्ज देणाऱ्या संस्थेस कळवू शकता. कर्ज देणाऱ्या संस्थेकडून कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवून घेऊ शकता. थकीत कर्जातून सवलत मिळवण्यासाठी तुम्ही तुमची गुंतवणूक रद्द करू शकता. मित्र, कुटुंबियांची मदत कर्ज परतफेडीसाठी घेऊ शकता. लोन सेटलमेंटचा पर्याय देखील तुम्ही वापरू शकता.

  First published:

  Tags: EMI, Investment, Loan, बँक