नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज हा पैशांची व्यवस्था करण्याचा एक चांगला मार्ग बनला आहे. कर्जाचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या मालमत्तेवर कर्जदेखील घेऊ शकतो. जेव्हा अचानक पैशाची गरज भासते, जेव्हा तुम्हाला मोठ्या रकमेची गरज भासते तेव्हा पैसे उभे करण्याचा मालमत्ता कर्ज हा एक चांगला मार्ग आहे. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत त्याचे व्याजदेखील कमी आहे. मालमत्ता कर्ज हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. यामध्ये घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले जाते. मालमत्तेवर कर्ज देण्यासाठी बँका ग्राहकाचे उत्पन्न, क्रेडिट इतिहास आणि मालमत्तेचे मूल्य पाहतात. जर तुमचाही इरादा मालमत्तेवर कर्ज घेण्याचा असेल तर तुम्हाला आधी काही गोष्टींची माहिती घ्यावी. व्याजदरांची तुलना करा - मालमत्तेवरील कर्जाचा व्याजदर 9 ते 18 टक्क्यांपर्यंत असतो. व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून असतात. बँका ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, कर्जाचा कालावधी आणि कर्जाची रक्कम यावर आधारित व्याजदर ठरवतात. वेगवेगळ्या बँकांचे दरही वेगवेगळे आहेत. त्यामुळे आधी व्याज तपासणे फायदेशीर ठरते. कर्ज क्षमता मूल्यांकन - मालमत्तेवर कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही तुमची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील उत्पन्नाचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकत नसाल तर तुमची संपत्ती तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे, तुम्ही तेवढ्याच रकमेचे कर्ज घ्यावे, ज्याचे हप्ते तुम्ही सहज फेडू शकता. हेही वाचा - शेअर मार्केटमध्ये ‘हा’ स्टॉक सुस्साट, तिप्पट रिटर्नमुळे गुंतवणूकदारांची चांदी प्रक्रिया शुल्क - बहुतेक बँका कर्जाच्या रकमेच्या सुमारे 1 टक्के प्रक्रिया शुल्क आकारतात. व्याजदरांप्रमाणेच प्रक्रिया शुल्काबाबतही बँकांचे वेगवेगळे नियम आहेत. काही बँका कमी प्रक्रिया शुल्क आकारतात तर काही जास्त शुल्क आकारतात. त्यामुळे कर्ज घेताना प्रोसेसिंग फीची माहिती घेणे योग्य ठरते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते. कर्जाचा कालावधी - कर्जाचा कालावधी देखील खूप महत्वाचा आहे. तुम्ही अल्प कालावधीसाठी कर्ज घेतल्यास, EMI जास्त असेल आणि व्याजदर कमी असेल. त्याचप्रमाणे, जेव्हा कर्जाचा कालावधी मोठा असतो तेव्हा EMI कमी राहतो. मात्र, व्याजाच्या स्वरूपात जास्त पैसे द्यावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.