मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan : 'या' 5 कारणामुळं बँक फेटाळू शकते गृहकर्जाचा अर्ज, वेळीच घ्या काळजी

Home Loan : 'या' 5 कारणामुळं बँक फेटाळू शकते गृहकर्जाचा अर्ज, वेळीच घ्या काळजी

Home Loan : ‘या’ 5 कारणामुळं बँक फेटाळू शकते गृहकर्जाचा अर्ज, वेळीच घ्या काळजी

Home Loan : ‘या’ 5 कारणामुळं बँक फेटाळू शकते गृहकर्जाचा अर्ज, वेळीच घ्या काळजी

Reasons for Rejection of Home Loan: गृहकर्जाची रक्कम ही मोठी असते. परतफेडीचा कालावधीही २०-३० वर्ष असा मोठा असतो. याच कारणामुळे बँका कुणालाही होम लोन देताना खूप विचार करतात.

  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 15 जुलै : आपलं स्वतःच्या मालकीचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकजण त्यासाठी अफाट मेहनत घेत असतो. परंतु तरीही अनेकांना घर घेता येईल एवढे पैसे जमवता येत नाहीत. मग पर्याय उरतो तो गृहकर्जाचा. गृहकर्जाची (Home loan) रक्कम ही मोठी असते. परतफेडीचा कालावधीही 20-30 वर्षांपर्यंत मोठा असतो. याच कारणामुळे बँका होमलोन देताना खूप विचार करतात. विविध ठोकताळ्यांतून ग्राहकांना परखलं जातं. कर्जदार घेतलेलं कर्ज फेडू शकेल का? कर्ज घेऊन तो फरार तर होणार नाही ना? कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी रिकव्हरी एजंटची गरज भासणार नाही ना? अशा प्रत्येक गोष्टीचा विचार बँका करत असतात. या सगळ्याची हमी मिळाल्यावरच बँका कर्ज देतात. गृहकर्जाची रक्कम एनपीए (NPA) किंवा दिवाळखोर खात्यात जावू नये, याचीही काळजी बँका घेतात. असं झाल्यास बँकाना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. सर्व बाजूंनी विचार केल्यावरच बँका गृहकर्जाचा अर्ज (Hoam Loan Application) मंजूर करतात. याच कारणामुळं गृहकर्ज मिळायला उशिर होतो. कधीकधी तर असं होतं की कित्येक हेलपाट्यानंतरही ग्राहकांना गृहकर्ज मिळत नाही. जर तुमच्यासोबतही असा प्रकार होऊ नये, असं वाटत असेल तर तुम्हाला बँका गृहकर्ज द्यायला नकार का (Why banks rejects home loan Application?) देतात, याची कारणं माहीत असणं, महत्त्वाचं आहे.

1. कमी क्रेडीट स्कोर (Low Credit Score):

तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा आरसा म्हणजे सिबिल स्कोर (Cibil Score) होय. याची रेंज 300 ते 900 पर्यंत असते. साधारणपणे बँका अशाच लोकांना कर्ज देतात, ज्यांचा सिबिल स्कोर 701 पेक्षा जास्त असतो. जर सिबिल स्कोर 650 असेल तर तुमचा गृहकर्जाचा अर्ज नाकारला जावू शकतो. सिबिल स्कोर कमी असेल तर तो वाढवण्यासाठी आधी घेतलेलं कर्ज वेळेत आणि लवकर भरणं गरजेचं आहे. बिल किंवा पेमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब न झाल्यास क्रेडिट स्कोर सुधारू शकतो. त्यामुळे वेळोवेळी क्रेडिट रिपोर्ट चेक करायला हवा.

हेही वाचा- Voting Card: मतदानकार्ड नसलं तरीही करू शकता वोटींग; मतदान केंद्रावर दाखवा ‘ही’ कागदपत्रे

2. वारंवार बदलू नका नोकरी (Don’t change your job Frequently):

ज्याच्या हातात चांगली नोकरी असते, तोच कर्जाचे हप्ते वेळेत फेडू शकतो. बँक नेहमी अशाच ग्राहकांना कर्ज द्यायला प्राधान्य देते, जिथे रिस्क कमी असेल. ज्याची नोकरी स्थिर आहे,अशा व्यक्तीला कर्ज दिल्यास कर्ज वेळेत फेडलं जाण्याची शक्यता जास्त असते. जे लोक वारंवार नोकरी बदलत नाहीत, अशा लोकांचं आयुष्य अधिक सुरक्षित मानलं जातं. वारंवार नोकरी बदलण्यामुळं अस्थिरतेचे संकेत मिळतात. त्यामुळे स्थिर नोकरी असलेल्या लोकांना कर्जासाठी अधिक प्राधान्य दिलं जातं.

3. कागदपत्रांची करा पुर्तता (fulfill all the required Documents):

लोन मंजूरीसाठी अनेक प्रकारची कागदपत्रे लागतात. त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करून चालत नाही. बँकाना कधीच अपूर्ण कागदपत्रे देऊ नयेत. ज्या लोकांची कागदपर्ते व्यवस्थित असतात, अशा लोकांवर बँका जास्त विश्वास दाखवतात. त्यावरूनच त्यांना ग्राहकाच्या क्षमतेवर विश्वास येतो. ज्या जमिनीवर घर बनवण्यासाठी कर्ज घेत आहात, त्याची कागदपत्रे कायदेशीररित्या वैध असावी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार असू नये. योग्य कागदपत्रे असल्यास गृहकर्ज लवकर मंजूर होऊ शकते, अन्यथा तुमचा अर्ज फेटाळला जावू शकतो.

हेही वाचा- Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते महत्त्वपूर्ण माहिती

4.आधीपासूनच जर कर्ज असेल, तर व्हा सावध-

तुमच्यावर आधीपासूनच एखादं कर्ज आहे का याची बँका माहिती घेतात. तुम्ही त्या कर्जाचे हप्ते वेळेत भरले आहेत की नाही, हे बँका पाहतात. त्यात दिरंगाई झाली असेल तरीही तुमचा कर्जाचा अर्ज फेटाळला जावू शकतो. तुम्ही जर पहिलं लोन पूर्णपणे फेडलं असेल, तर तुम्हाला लवकर मंजूरी मिळू शकते. त्यामळे नवं कर्ज घेण्यापूर्वी जुनं कर्ज फेडलं असेल, तर तुमचं गृहकर्ज सहजपणे मंजूर होऊ शकते.

5. आईटीआर न भरणे (Incom tax)-

गृहकर्जासाठी तुम्हाला दोन वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न द्यावा लागतो. जर तुम्ही पगारी नोकरदार असाल  आणि कंपनीकडून १६ ए फॉर्म मिळाला नाही, तरीही तुम्हाला आईटीआर रिटर्न भरायला हवा. आईटीआर भरल्यामुळे तुमची विश्वासार्हता आणखी वाढते आणि कर्ज मिळण्याची शक्यताही वाढते. आईटीआरवरून बँकांना तुमची कर्ज फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.

First published:

Tags: Home Loan, Sbi home loan