मराठी बातम्या /बातम्या /मनी /

विप्रोने तर कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढलं, पण इतर IT कंपन्यांचं Moonlightingवर मत काय?

विप्रोने तर कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढलं, पण इतर IT कंपन्यांचं Moonlightingवर मत काय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

खरंतर आयटीमध्ये दोन वेगवेगळे वर्ग आहेत. काही कंपन्यांना मूनलाइटिंगबाबत हरकत वाटत नाही, तर काही कंपन्यांसाठी हे फ्रॉड आहे.

    मुंबई 22 सप्टेंबर : असे अनेक लोक आहेत, जे आयटी कंपनीत जॉब करतात. गलेलठ्ठं पागर, सुट्ट्या, सोबत मिळणाऱ्या सवलती आणि गिफ्ट हे नेहमीच आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. अनेक लोकांचं आयटीमधील मोठ-मोठ्या कंपनी जसे विप्रो, टाटा, इन्फोसीस सारख्या कंपनीमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. परंतू लोकांना या कंपनीमधील काही नियम माहिती नसतात, ज्यामुळे त्यांना समस्येंना सामोरं जावं लागतं. सध्या विप्रो आयटी कंपनीमधील प्रकरण चर्चेत आहे. कंपनीमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं, ज्यामुळे सर्वच आयटी कंपनीमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तुम्ही कधी मूनलाइटिंग हा शब्द ऐकला आहे? नसेल तर चला याबद्दल आधी जाणून घेऊ. मूनलाइटिंग म्हणजे कंपनीच्या निश्चित कामाच्या तासांनंतर, एखादा कर्मचाऱ्यारी त्याचे दुसरे काम करु शकतो, जसे की, फ्रिलांसिंग आणि हे काम करण्यासाठी तो मोकळा आहे. परंतू असं असलं तरी देखील अनेक अशा आयटी कंपन्या आहेत, ज्या याला विरोध दर्शवतात आणि याबाबत ते त्यांच्या ऑफर लेटरमध्ये देखील लिहितात. परंतू याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. खरंतर आयटीमध्ये दोन वेगवेगळे वर्ग आहेत. काही कंपन्यांना मूनलाइटिंगबाबत हरकत वाटत नाही, तर काही कंपन्यांसाठी हे फ्रॉड आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची नोकरी देखील जाऊ शकते. चला जाणून घेऊया याबाबत कोणती कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला काय सुट देते एका व्यावसायिक वेबसाइटने या संदर्भात दिग्गज कंपन्यांनी जारी केलेल्या नियुक्ती पत्राशी संबंधित माहिती दिली. त्यांनी अशा कंपन्यांबाबत सांगितलं आहे, ज्यांनी 'जॉब कॉन्ट्रॅक्ट'मध्ये मूनलाइटिंगला सपोर्ट केला आहे की नाही ते. विप्रो विप्रोच्या ऑफर लेटरमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की, कर्मचाऱ्यांना केवळ कंपनीसाठी काम करावे लागेल. इतर कोणत्याही कामासाठी कर्मचाऱ्याला व्यवसाय युनिट प्रमुखाची परवानगी घ्यावी लागेल. विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षांनी मूनलाइटिंगला चुकीचे म्हटले आणि त्यांनी याला कंपनीची फसवणूक असल्याचे म्हटलं आहे. हे वाचा : ‘मूनलायटिंग’ का आहे चर्चेत, विप्रो प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांची वाढली चिंता टीसीएस देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचार्‍यांना नोकरीशिवाय इतर काम करू देत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला तसे करायचे असल्यास त्याला यासाठी लेखी मान्यता घ्यावी लागते. कंपनीचे सीईओ गणपति सुब्रमण्यम सांगतात की मूनलाइटिंग करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ फायदा होतो पण दीर्घकाळात त्याचे तोटा होतो. ज्यामुळे त्यांचा यासाठी विरोध आहे. इन्फोसिस इन्फोसिस मूनलाइटिंगच्या विरोधात आहे. कंपनीच्या अटी स्पष्टपणे सांगतात की तुम्ही इन्फोसिसच्या संमतीशिवाय तुम्ही तुमच्या कामानंतर काहीही करु शकता. कंपनीचे माजी संचालक मोहनदास पै मूनलाइटिंग योग्य असल्याचे मानतात. ऑफिसच्या वेळेनंतर कोणी काय करायचं, हा त्या कर्मचाऱ्यांचा निर्णय आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. टेक महिंद्रा टेक महिंद्राच्या करारात असे लिहिले आहे की, जर तुम्ही कंपनीच्या मंजुरीशिवाय कोणतेही काम हाती घेतले तर तुम्हाला कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकले जाऊ शकते. मात्र, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी यांचे याबाबत वेगळं मत आहे. ते म्हणतात की जर कर्मचांनी त्यांचे काम पूर्ण केले असेल, तर ते पुन्हा दुसरे काम करू शकते. हे वाचा : विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना काढलं, शेअर बाजारात बसणार का मोठा फटका? एचसीएल टेक एचसीएल टेक्नॉलॉजीच्या करारात कंपनीचा कोणताही कर्मचारी इतर कोणत्याही कंपनीसाठी कोणतेही काम करू शकत नाही, असे लिहिले आहे. यामध्ये कंपनी दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रातली असली तरी देखील मूनलाइटिंगला नाही म्हटलं आहे. HCN ने याला नोकरीची अनिवार्य अट म्हटले आहे आणि असे करणे हे नोकरीच्या अटींचे उल्लंघन आहे.
    Published by:Devika Shinde
    First published:

    Tags: Job, Social media, Viral news

    पुढील बातम्या