मराठी बातम्या /बातम्या /मनी /

‘मूनलायटिंग’ का आहे चर्चेत, विप्रो प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांची वाढली चिंता

‘मूनलायटिंग’ का आहे चर्चेत, विप्रो प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांची वाढली चिंता

अनेक कर्मचारी एकावेळी दोन कंपन्यांमध्ये काम करत असतात. ‘वर्क फॉर्म होम’मुळे याचं प्रमाण अधिकच वाढलं आहे.

अनेक कर्मचारी एकावेळी दोन कंपन्यांमध्ये काम करत असतात. ‘वर्क फॉर्म होम’मुळे याचं प्रमाण अधिकच वाढलं आहे.

अनेक कर्मचारी एकावेळी दोन कंपन्यांमध्ये काम करत असतात. ‘वर्क फॉर्म होम’मुळे याचं प्रमाण अधिकच वाढलं आहे.

    मुंबई : अनेक कर्मचारी (Employees) एकावेळी दोन कंपन्यांमध्ये (Companies) काम करत असतात. ‘वर्क फॉर्म होम’मुळे (Work Form Home) याचं प्रमाण अधिकच वाढलं आहे. अशावेळी याचा परिणाम कंपनीच्या रिझल्ट्सवर होतो. त्यामुळे बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनाविरुद्ध कठोर निर्णय घेऊ लागल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रो लिमिटेडने (Wipro Limited) मूनलायटिंग (Moonlighting) अर्थात एकाच वेळी दोन ठिकाणी काम करणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. आयटी कंपनी विप्रोने 300 कर्मचार्‍यांना मूनलायटिंग पद्धतीने काम केल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकलं. याबाबत विप्रोचे चेअरमन रिशाद प्रेमजी म्हणाले, ‘विप्रोच्या पगारावर असताना प्रतिस्पर्धी कंपन्यांसोबत काम करणाऱ्या अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीत स्थान नाही.’ म्हणून नोकरीवरुन काढलं रिशाद प्रेमजी यांनी बुधवारी (21 सप्टेंबर 2022) ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (AIMA) राष्ट्रीय परिषदेत सांगितलं की, 'मूनलायटिंग हे कंपनीशी असलेल्या निष्ठेचं पूर्णपणे उल्लंघन आहे. वास्तविकता अशी आहे की, आज असे लोक आहेत जे विप्रोसोबत प्रतिस्पर्धी कंपनीसाठीही काम करतात. आम्ही गेल्या काही महिन्यांत अशा 300 कर्मचाऱ्यांचा शोध घेतलाय.’ ते पुढे म्हणाले, ‘नियमभंग केल्यामुळे या 300 कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्यात आलं.’ कर्मचार्‍यांनी कंपनीतील नियमित कामाच्या तासांनंतर इतर कामं केल्यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची भीती आयटी कंपन्यांना आहे, आणि यामुळे संघर्ष आणि डेटा ब्रीचसारख्या परिस्थितीदेखील उद्भवू शकतात. हे वाचा-विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना काढलं, शेअर बाजारात बसणार का मोठा फटका? दरम्यान, विप्रोचे प्रमुख हे मूनलायटिंगचे सुरुवातीपासूनच कठोर टीकाकार आहेत. त्यांनी याची तुलना कंपनीशी केलेल्या फसवणुकीशी केली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी ट्विटरवर म्हटलं होतं की, ‘आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या मूनलायटिंगबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. हा कंपनीचा थेट विश्वासघात आहे.’ उद्योगक्षेत्रात मूनलायटिंगबाबत मतभेद विप्रोच्या चेअरमनने नुकत्याच मूनलायटिंगबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्योग क्षेत्रात नवा वाद सुरू झालाय. आयटी कंपनी इन्फोसिसने कंपनीतील नोकरीसह इतर ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिलाय. विप्रोने तर कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढलं, पण इतर IT कंपन्यांचं Moonlightingवर मत काय? इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटलंय की, ‘कर्मचाऱ्यांना मूनलायटिंग करण्यास परवानगी नाही. यामुळे कराराचं कोणत्याही पद्धतीने उल्लंघन झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल.’ आयटी कंपनी आयबीएमनेही मूनलायटिंगला अनैतिक म्हटलं आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप पटेल यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, ‘कंपनीतील कामाचे तास वगळता कर्मचारी त्यांच्या इतर वेळात त्यांना हवं ते करू शकतात, परंतु त्यामध्ये मूनलायटिंग करणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही.’ तर, टेक महिंद्राचे अधिकारी सीपी गुरनानी यांनी नुकतंच ट्विट करत मूनलायटिंगचं एकप्रकारे समर्थन केलंय. त्यांनी म्हटलंय, ‘काळानुसार बदलत राहणं महत्त्वाचं आहे, आणि मी आमच्या कामाच्या पद्धतीतील बदलाचं स्वागत करतो.’ गेल्या काही दिवसांत नवीन प्रथा म्हणून मूनलायटिंगचं प्रमाण वाढत आहे. पण यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढली असून, हे प्रकार रोखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे.
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या