मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Income Tax : 16 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करायचंय? 'असं' करा नियोजन

Income Tax : 16 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करायचंय? 'असं' करा नियोजन

 योग्य नियोजन केल्यास अगदी 15 ते 16 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावरही कोणताही कर भरावा लागणार नाही. यासाठी गुंतवणूक कशी करावी याबाबतची माहिती देत आहोत.

योग्य नियोजन केल्यास अगदी 15 ते 16 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावरही कोणताही कर भरावा लागणार नाही. यासाठी गुंतवणूक कशी करावी याबाबतची माहिती देत आहोत.

योग्य नियोजन केल्यास अगदी 15 ते 16 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावरही कोणताही कर भरावा लागणार नाही. यासाठी गुंतवणूक कशी करावी याबाबतची माहिती देत आहोत.

मुंबई, 30 नोव्हेंबर : दरवर्षी डिसेंबर महिना आला, की नोकरदार वर्गाची करबचतीसाठीच्या (Tax savings) गुंतवणुकीची (Investment) गडबड सुरू होते. बहुतांश कंपन्या डिसेंबरमध्येच आपल्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीची माहिती देण्यास सांगतात. ती माहिती प्राप्तिकर खात्याकडे (Income Tax Department) पाठवली जाते. त्यानुसार कर्मचारी आपलं प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return ) भरतात. करबचत करण्यासाठी वर्षभर गुंतवणुकीचं नियोजन करणं आवश्यक असतं. योग्य नियोजन केल्यास अगदी 15 ते 16 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावरही कोणताही कर भरावा लागणार नाही. यासाठी गुंतवणूक कशी करावी याबाबतची माहिती देत आहोत. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा, तुम्ही एका मोठ्या कंपनीत काम करत आहात आणि तुमचा वार्षिक पगार 16 लाख रुपये आहे. आता यावर भरपूर कर भरावा लागत असेल, असं वाटत असेल ना; पण तसं नाही. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास यावर शून्य कर (Zero tax) भरावा लागणार आहे.

पगारदार व्यक्तींना 50,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन (Standard Deduction) सूट दिली जाते. त्यामुळे पहिल्यांदा ही 50,000 रुपयांची बचत सहज शक्य आहे. ही सूट पगाराच्या रकमेतून वजा केली तर आता एकूण रक्कम 15 लाख 50 हजार रुपये झाली आहे, ज्यावर कर आकारला जाईल. तुम्ही गृहकर्ज (Home Loan) घेतलं असेल आणि त्यावर व्याज भरत असाल तर तुम्ही 2 लाख रुपयांची करसवलत घेऊ शकता. अशा प्रकारे, कराखाली येणारी एकूण रक्कम 13 लाख 50 हजार रुपयांवर आली आहे. यानंतर तुम्ही कलम 6A अंतर्गत विविध कपातीचा लाभ घेऊ शकता.

देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती

कलम 80C अंतर्गत फक्त कलम 6A अंतर्गत वेगवेगळ्या गुंतवणुकीवर कर वाचवू शकता. तुम्ही एलआयसी (LIC), 5 वर्षांची मुदत ठेव (FD), पीपीएफ (PPF), पीएफ (PF) इत्यादींमध्ये गुंतवणूक केल्यास, तसंच गृहकर्जाची मुद्दल परतफेड या बाबींवर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. अशा प्रकारे, आता कर कक्षेत येणारे तुमचं उत्पन्न 12 लाख रुपये होईल. तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (NPS) गुंतवणूक केल्यास कलम 80CCD अंतर्गत 50 हजार रुपये वाचवू शकता. आता एकूण करपात्र उत्पन्न 11 लाख 50 हजार रुपये राहिलं आहे. यानंतर कलम 80D अंतर्गत 25 हजार रुपयांची बचत करता येईल. ही सवलत वैद्यकीय विम्यावरची असेल. यामुळे एकूण प्राप्तिकराखालील रक्कम 10 लाख 75 हजार रुपये होईल. वृद्ध पालकांसाठी वैद्यकीय विम्याचा (Mediclaim Premium) हप्ता भरल्यास, कलम 80 डी अंतर्गत 50 हजार रुपयांची बचत करता येते. म्हणजे ही सवलत घेतल्यास एकूण करपात्र उत्पन्न 10,25,000 रुपये होईल.

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी खर्च केल्यास कलम 80D अंतर्गत आणखी 5,000 रुपयांचा दावा करू शकता. तुम्ही स्वतःसाठी, पालकांसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी हा खर्च केल्यास त्याचा दावा करता येतो. याशिवाय, कुटुंबातल्या एखाद्या अपंग व्यक्तीच्या उपचारावर खर्च केल्यास, त्याला कलम 80DD अंतर्गत 1 लाख 25 हजार रुपयांची अतिरिक्त करसवलत मिळू शकते. अशा प्रकारे आता 8 लाख 95 हजार रुपये कराच्या कक्षेत येतील. कलम 80DDB अंतर्गत कोणत्याही आजारासाठी 1 लाख रुपये वाचवले जाऊ शकतात. तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल आणि ते 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान असेल, तर त्याला कलम 80EEA अंतर्गत 2 लाख रुपयांची वजावट मिळेल. अशा प्रकारे आता केवळ 5 लाख 95 हजार रुपयेच कराच्या कक्षेत येतील.

'Omicron Variant' मुळे 'या' क्रिप्टोकरन्सीत मोठी उसळी, तीन दिवसात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

शैक्षणिक कर्जावर (Education Loan) व्याज भरल्यास दीड लाख रुपयांपर्यंत बचत करता येते. 15 लाखांचं शैक्षणिक कर्ज घेतलं असेल तर एकूण रकमेच्या 10 टक्के करसवलत घेता येईल. अशा प्रकारे एकूण करपात्र उत्पन्न 4 लाख 45 हजार रुपयांवर येईल. कलम 80G अंतर्गत 90 हजार रुपयांपर्यंत देणगी दिली तर यापैकी 50 टक्के म्हणजेच 45 हजार रुपयांची कर सूट मिळू शकते. यामुळे करपात्र एकूण रक्कम 4 लाख रुपये झाली. आता या 4 लाखांच्या कमाईवर फक्त 12 हजार 500 रुपये कर बसेल. कलम 87A अंतर्गत त्यातही सवलत मिळू शकते. अशा प्रकारे तब्बल 16 लाख रुपये उत्पन्नावरही तुमचं संपूर्ण करदायित्व शून्य होतं. तेव्हा तुम्हालाही कर वाचवायचा असेल तर या प्रकारे गुंतवणुकीचं नियोजन करता येईल.

First published:

Tags: Income tax, Money