मराठी बातम्या /बातम्या /मनी /Investment Tips: गुंतवणुकीसाठी Voluntary Provident fund चांगला पर्याय, टॅक्स बचतीचाही फायदा

Investment Tips: गुंतवणुकीसाठी Voluntary Provident fund चांगला पर्याय, टॅक्स बचतीचाही फायदा

Voluntary Provident fund खात्यावर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याप्रमाणेच व्याज मिळते. VPF मधील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

Voluntary Provident fund खात्यावर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याप्रमाणेच व्याज मिळते. VPF मधील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

Voluntary Provident fund खात्यावर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याप्रमाणेच व्याज मिळते. VPF मधील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

मुंबई, 7 फेब्रुवारी : प्रत्येक गुंतवणूकदाराला (Investors) असे वाटते अशा ठिकाणी पैसे गुंतवावे जेथे कमी वेळेत जास्तीत जास्त परतावा मिळेल, पैसाही सुरक्षित असावा. रिटर्नसह काही अतिरिक्त लाभ मिळायला हवा. अशीच एक गुंतवणूक योजना म्हणजे भविष्य निर्वाह निधी (Provident Fund).

नोकरदारांसाठी पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये कर्मचारी दरमहा त्यांच्या पगारातून काही भाग गुंतवतात. यासह, नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयर देखील कर्मचार्‍यांच्या खात्यात समान भाग जमा करतो. यामध्ये पैसा सुरक्षित राहतो आणि खूप दिवसांनी चांगला परतावाही मिळतो. पण पीएफमध्येच एक पर्याय आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही पीएफपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता.

आपण वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंडबद्दल (Voluntary Provident fund) बोलत आहोत. हा एक प्रकारचा भविष्य निर्वाह निधी आहे. पण त्याच्या अटी, मर्यादा प्रोव्हिडंट फॅन्सपेक्षा वेगळ्या आहेत.

LIC IPO : तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर स्वस्तात मिळणार शेअर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नियोक्ता आणि कर्मचारी दोघांचे योगदान आहे, जे कर्मचार्‍यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या (DA) 12-12 टक्के आहे. नियोक्त्याच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो. उर्वरित भाग कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा होतो. एखाद्या कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधीमध्ये त्याचे योगदान वाढवायचे असेल, तर Voluntary Provident fund (VPF) द्वारे, त्याचे पीएफमधील योगदान वाढवता येईल.

Voluntary Provident fund म्हणजे काय?

Voluntary Provident fund पीएफमध्ये, कर्मचारी त्याच्या मूळ वेतनाच्या 100 टक्क्यांपर्यंत योगदान देऊ शकतो. या निधीमध्ये फक्त कर्मचाऱ्यांचे योगदान वाढू शकते, नियोक्त्याचे नाही. नियोक्त्याचे योगदान 12 टक्के मर्यादित आहे. ऐच्छिक पीएफ सुविधा फक्त पगारदार कर्मचाऱ्यांसाठी आहे.

गुंतवणूक कशी करावी?

Voluntary Provident fund चा लाभ घेण्यासाठी, कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीच्या HR शी संपर्क साधावा लागेल आणि त्याला सांगावे लागेल की त्याला PF मध्ये त्याचे योगदान किती आहे आणि किती वाढवायचे आहे. जर तुमच्या कंपनीत VPF ची सुविधा असेल, तर फॉर्ममध्ये योगदानाची रक्कम लिहून HR कडे जमा करावी लागेल. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होते.

किती परतावा?

Voluntary Provident fund खात्यावर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याप्रमाणेच व्याज मिळते. VPF मधील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. या फंडामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर सूटचा दावा करू शकता. EPF आणि VPF मधून मिळालेले पैसे आणि 5 वर्षांच्या सेवेनंतर काढलेले पैसे यावर करसवलत नाही.

ICICI बँक क्रेडिट कार्ड यूजर्सना झटका, 10 फेब्रुवारीपासून अनेक चार्जेस वाढणार

VPF चे फायदे

नोकरी बदलल्यावर EPF प्रमाणे VPF निधी देखील हस्तांतरित केला जाऊ शकतो. या निधीची संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते. 5 वर्षांच्या सेवेनंतर या खात्यातून आंशिक रक्कम काढता येते. पैसे काढण्यासाठी ऑनलाइन दावा केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Investment, Money, PF Amount