मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टोकरन्सीवर बंदीच्या चर्चांदरम्यान डिजिटल करन्सीच्या किमती घसरल्या

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टोकरन्सीवर बंदीच्या चर्चांदरम्यान डिजिटल करन्सीच्या किमती घसरल्या

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

क्रिप्टोकरन्सी व्यवहार सुलभ करणारे वझीरक्स (Wazirx) सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म लाल चिन्हावर व्यापार करताना दिसले. Cryptocurrency Ethereum (Ethereum Price Update Today) देखील किंचित घसरणीसह 3,18,692 वर ट्रेड करत होती.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 25 नोव्हेंबर : केंद्र सरकारकडून (Central Government) क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या आणि विधेयकाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये मोठा चढ-उतार होत आहे. बिटकॉईनमध्ये (Bitcoin Price Today) 0.18 टक्क्यांची घसरण झाली. बिटकॉईन सध्या 42,58,014 रुपयांवर ट्रेड करत आहे.

बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला तेजी होती. बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीची किंमत 57,000 डॉलरच्या वर गेली आहे. जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय डिजिटल करन्सी 1 टक्क्यांनी वाढून 57,714 वर ट्रेड करत होती. बिटकॉइनने अलीकडेच सुमारे 69,000 चा रेकॉर्ड हाय गाठला आहे.

क्रिप्टोकरन्सी व्यवहार सुलभ करणारे वझीरक्स (Wazirx) सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म लाल चिन्हावर व्यापार करताना दिसले. Cryptocurrency Ethereum (Ethereum Price Update Today) देखील किंचित घसरणीसह 3,18,692 वर ट्रेड करत होती.

स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स

सरकारच्या घोषणेनंतर बाजार दबावाखाली

सरकार क्रिप्टोकरन्सी कायद्याच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. यासाठी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter session) यासंदर्भातील विधेयक आणत आहे. सोमवार, 29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सरकारच्या या घोषणेनंतर क्रिप्टोमध्ये घसरण झाली. मात्र सध्या बाजारात सुधारणांचा वेग पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर

क्रिप्टोकरन्सी बिल (Cryptocurrency Bill)

केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करणार आहे. या विधेयकाद्वारे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत अधिकृत क्रिप्टोकरन्सी जारी करण्यासाठी एक सुलभ फ्रेमवर्क तयार करण्याची सरकारची योजना आहे. त्याचे तंत्रज्ञान आणि वापराबाबतही तयारी सुरू आहे. तसेच, अशी तरतूद या विधेयकांतर्गत आणली जाईल, ज्यामुळे सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी येईल.

First published:

Tags: Cryptocurrency, Money