नवी दिल्ली, 21 जानेवारी : Paytm, Google Pay अशा पेमेंट वॉलेटचा वापर तुम्ही करत असाल तर तुम्हाला कॅश बाळगायची काळजी नसते. पण असंच एक पेमेंट वॉलेट बंद होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India)व्होडाफोन m-Pesa या पेमेंट वॉलेटचं लायसन्स रद्द केलं आहे. RBI च्या या कारवाईमुळे Vodaphone m-Paisa हा आपला बिझनेस सुरू ठेवू शकत नाही. m-Pesa कडे आता फक्त प्रिपेड इन्स्ट्रुमेंटच्या रूपात सुविधा देण्याचा अधिकार असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच ही माहिती दिली आहे. 3 वर्षांच्या आत क्लेम सेटलमेंट m-Paisa चे कस्टमर आणि मर्चंट्स POS नुसार व्हॅलिड क्लेम करू शकतात. लायसन्स रद्द केल्यानंतर 3 वर्षांच्या आत ते क्लेम सेटलमेंट करण्याचा दावा करू शकतात. Vodaphone नेच ही सेवा बंद करण्यासाठी RBI कडे अर्ज केला होता, असं कंपनीने म्हटलं आहे. (हेही वाचा : Zomato ने Uber Eats ने घेतलं विकत, कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार) RBI ने 11 पेमेंट बँकांना दिलं होतं लायसन्स Vodaphone - Idea अॅपने काही वर्षांपूर्वीच m-Pesa बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेड बंद झालं होतं. ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतरच व्होडाफोन (vodaphone)आणि आयडिया (idea)चं एकत्रिकरण झालं होतं. RBI ने 2015 मध्ये सुमारे 11 पेमेंट बँकांचं लायसन्स जारी केलं होतं. व्होडाफोन m-Pesa त्यापैकीच एक आहे. कॅशलेस व्यवहारांमध्ये पेमेंट वॉलेटचा चांगला फायदा होतो पण त्याचबरोबर वेळोवेळी अपडेट राहून हे वॉलेट वापरण्याची खबरदारीही घ्यावी लागते. =======================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







