Coronavirusची स्मार्टफोनलाही होतेय बाधा, टीव्ही आणि फ्रीजवरही परिणाम

Coronavirusची स्मार्टफोनलाही होतेय बाधा, टीव्ही आणि फ्रीजवरही परिणाम

कोरोना व्हायरसचा जगभरातल्या व्यापारावर परिणाम झालाय. त्यातच आता कोरोना व्हायरसमुळे भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत.

  • Share this:

एम. सरस्वती

मुंबई, 24 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसचा जगभरातल्या व्यापारावर परिणाम झालाय. त्यातच आता कोरोना व्हायरसमुळे भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झालाय आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग झाल्या आहेत. स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. या वस्तूंचा पुरवठा कमी होऊ शकतो किंवा या वस्तूंच्या दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

दक्षिण कोरियातही फैलाव

चीन आणि दक्षिण कोरियाच्या कंपन्यांशी आमची चर्चा सुरू आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा आहे, असं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या घाऊक विक्रेत्याने सांगितलं.

चीनमधल्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भीषण झाली. चीन आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये सॅमसंग, LG या कंपन्यांचं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन होतं. नेमक्या याच देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झालाय.

(हेही वाचा : मेलानिया ट्रम्प यांची ताजमहाल भेट आणि पांढऱ्या जंपसूटचं भारतीय कनेक्शन)

एसी आणि टीव्हीवरही परिणाम

जगभरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांपैकी 23 टक्के वस्तूंचं उत्पादन चीनमध्ये होतं. कोरोना व्हायरसचा परिणाम मोबाइलच्या पुरवठ्यावर झालाय. मोबाइल विक्रेत्यांकडे एक महिन्याचाच साठा आहे, अशी माहिती आहे.

स्मार्टफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीने याआधीच जाहीर केलं आहे की, कोरोना व्हायरसच्या साथीचा परिणाम स्मार्टफोनच्या विक्रीवर होऊ शकतो. मोबाइल फोनप्रमाणेत रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स आणि टेलिव्हिजनचा पुरवठा आणि विक्रीही घटू शकते.

वर्क फ्रॉम होम

AC आणि रेफ्रिजरेटर्सची मुख्यत: फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यातच विक्री होते. पण आता याच महिन्यांमध्ये या उत्पादनांचा तुटवडा जाणवणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी आता चिनी कंपन्या वेगवेगळे उपाय काढत आहेत.काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्यायही देण्यात आला आहे. पण कोरोनाच्या फैलावाची तीव्रता संपेपर्यंत इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतल्या कंपन्यांसाठी कसोटीचा काळ आहे.

=======================================================================================

First published: February 24, 2020, 9:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading