मुंबई : पावसाने ओढ लावल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम. दर दुप्पट वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. दोन महिन्यांपासून स्थिर असलेल्या भाजी-पाल्याचे दर आता वाढत आहेत. त्यामुळे भाजीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये प्रति किलो हा दर आता घाऊक बाजारातच दिसू लागला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. किरकोळ बाजारात आत्तापर्यंत २० रुपये किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या ४० रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात ८ ते १० रुपये किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता २२ ते २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कोथिंबिरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. दहा रुपये एक जुडी असा भाव असलेली कोथिंबीर आता ३० रुपयांवर पोहोचली आहे. वर्षातून फक्त 4 महिने तयार होते ही खास मिठाई, ‘या’ भाजीपासून होते तयार PHOTOS गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले होते. आता कडक ऊन पडत असल्याने पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी, पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा व बटाटा वगळता फळभाज्याही महागल्या आहेत. गवार, शिमला व मिरचीचे दर 80 रुपयांवर पोहोचले आहेत. जून, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात भाज्यांचे दर आवाक्यात होते. मात्र, मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता पाण्यामुळेही भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली असून त्यांचे दर वधारत चालले आहे. डॉक्टर पिता-पुत्र झाले आधुनिक शेतकरी, लाखोंची आहे कमाई; सरकारनेही केलं तोंडभरून कौतुक भाजी सध्याचे दर मागील किरकोळ दर भेंडी : सध्याचा दर : 60 ते 80 मागील किरकोळ दर : 40 ते 50 फरसबी: सध्याचा दर : 80 ते 90 मागील किरकोळ दर : 40 ते 60 गवार: सध्याचा दर : 70 ते 80 मागील किरकोळ दर : 50 ते 60 घेवडा : सध्याचा दर :60 ते 80 मागील किरकोळ दर :50 ते 60 कारली : सध्याचा दर : 60 ते 80 मागील किरकोळ दर : 50 ते 55 ढोबळी मिरची : सध्याचा दर : 70 ते 80 मागील किरकोळ दर : 60 ते 65 शेवगा शेंग : सध्याचा दर : 80 ते 90 मागील किरकोळ दर : 50 ते 60 सुरण : सध्याचा दर : 80 ते 90 मागील किरकोळ दर : 60 ते 70 मटार : सध्याचा दर : 100 ते 110 मागील किरकोळ दर : 60 ते 80 हिरवी मिरची : सध्याचा दर : 80 ते 90 मागील किरकोळ दर : 50 ते 60
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.