मराठी बातम्या /बातम्या /मनी /35 वर्ष जुन्या या इलेक्ट्रॉनिक कंपनीचं होणार अधिग्रहण; हा अब्जाधीश उद्योगपती ग्रुप करणार खरेदी

35 वर्ष जुन्या या इलेक्ट्रॉनिक कंपनीचं होणार अधिग्रहण; हा अब्जाधीश उद्योगपती ग्रुप करणार खरेदी

अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचं (Videocon Industries Limited) अधिग्रहण करणार आहे. यासाठी हा समूह या कंपनीला 292 कोटींची आगाऊ रक्कम देणार आहे.

अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचं (Videocon Industries Limited) अधिग्रहण करणार आहे. यासाठी हा समूह या कंपनीला 292 कोटींची आगाऊ रक्कम देणार आहे.

अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचं (Videocon Industries Limited) अधिग्रहण करणार आहे. यासाठी हा समूह या कंपनीला 292 कोटींची आगाऊ रक्कम देणार आहे.

नवी दिल्ली, 10 जून : अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह एसी, फ्रिज, टीव्ही यांसारखे कंझ्युमर ड्युरेबल उत्पादित करणाऱ्या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचं (Videocon Industries Limited) अधिग्रहण करणार आहे. यासाठी हा समूह या कंपनीला 292 कोटींची आगाऊ रक्कम देणार आहे. वेदांता समूहाने (Vedanta Group) बुधवारी याबाबत माहिती दिली. या अधिग्रहणानंतर हा समूह कृष्णा गोदावरी तेलक्षेत्रातील रावा तेल आणि वायू क्षेत्रातील सर्वात मोठा भागधारक होईल. रावा तेल क्षेत्रात दररोज 22,000 बॅरल तेल आणि तितकंच वायू उत्पादन होतं.

पेपर ट्यूब विक्रीतून सुरू झाला होता व्यवसाय -

1986 मध्ये औरंगाबाद (Aurangabad) येथील 3 भावांनी अधिगम ट्रेडिंग या नावाने कंपनी सुरू केली. ही कंपनी पेपर ट्यूब विक्रीचं काम करत होती. त्यानंतर नंदलाल माधवलाल धूत हे कलर टेलिव्हिजन उत्पादनाच्या व्यवसायात उतरले आणि त्यांनी दरवर्षी 1 लाख टीव्ही सेट उत्पादित करण्याचं उद्दिष्ट्य ठेवत व्हिडीओकॉन इंटरनॅशनलची स्थापना केली. 1990 च्या सुरुवातीला कंपनीने एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि होम एंटरटेनमेंट सिस्टमच्या उत्पादनास सुरुवात करत आपला पोर्टफोलियो अधिक विस्तारित बनवला. 1991 धूत ब्रदर्सनी (Dhoot Brothers) व्हिडीओकॉनचा रिब्रँड केला. यानंतर व्हिडीओकॉन देशातील सर्वात नामांकित ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅंड (Electronic Brand) म्हणून गणला जाऊ लागला.

एनसीएलटीने दिवाळखोर व्हिडीओकॉन इंडस्ट्रीच्या अधिग्रहणास दिली मंजुरी -

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठाने मंगळवारी वेदांता समूहाची कंपनी ट्विन स्टार टेक्नोलॉजीजकडून दिवाळखोर व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या अधिग्रहणाला मान्यता दिली. अनिल अग्रवाल यांच्या व्हॉलकॉन इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने लंडन स्टॉक एक्सचेंजला सांगितलं, की ट्विन स्टार टेक्नोलॉजीज इंडिया लिमिटेडने भारतातील दिवाळखोरी कायद्याअंतर्गत व्हिडीओकॉन ग्रुपच्या कंपन्यांसाठी एक ठराव योजना सादर केली.

कोरोना Vaccine घ्या आणि FD वर अधिक व्याज मिळवा, बँकेची जबरदस्त ऑफर

रावा क्षेत्रातील वाटा 47.5 टक्क्यांपर्यंत वाढेल -

कंपनीने सांगितलं, की व्हिडीओकॉन संपत्ती अधिग्रहण प्रस्तावात 292 कोटींची आगाऊ रक्कमही समाविष्ट आहे. ही एकूण बोली मूल्याच्या 10 टक्क्यांनी कमी आहे. अधिग्रहणाच्या तारखेपासून 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल. याबाबत वॉलकॉन इन्व्हेस्टमेंटने सांगितलं, की व्हिडीओकॉन अधिग्रहण आणि विशेषतः रावा तेलक्षेत्रातील (Rava Oil Sector) 25 टक्के भागीदारीबाबत आम्ही उत्साही आहोत. या अधिग्रहणामुळे रावा क्षेत्रातील आमची भागीदारी 47.5 टक्क्यांपर्यंत होईल.

दिवाळखोरीत गेलेल्या पहिल्या 12 कंपन्यांपैकी एक -

व्हिडीओकॉन ही एक कंझ्युमर ड्युरेबल्स कंपनी असून ती वॉशिंग मशीन पासून एअर कंडिशनरचं उत्पादन करते. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या निर्देशानंतर 2017 मध्ये दिवाळखोर झालेल्या पहिल्या 12 कंपन्यांपैकी व्हिडीओकॉन एक आहे. 12 नोव्हेंबर 2018 पर्यंत कंपनीवर 59, 451.87 कोटी रुपयांचं कर्ज बाकी होतं. त्यापैकी 57,443.62 कोटी रुपये हे तीन डझनहून अधिक बॅंका आणि वित्तीय संस्थांचे आहेत. या व्यतिरिक्त अन्य परिचालन लेखाकर्त्यांचे 25,553 कोटी रुपयांचे दावे आहेत.

First published:
top videos