Home /News /money /

कोरोना Vaccine घ्या आणि FD वर अधिक व्याज मिळवा, बँकेची जबरदस्त ऑफर

कोरोना Vaccine घ्या आणि FD वर अधिक व्याज मिळवा, बँकेची जबरदस्त ऑफर

काही सरकारी बँकांनी लोकांमध्ये वॅक्सिनेशनबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी, स्पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. जर तुम्ही लस घेतली असेल, तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉजिटवर (FD) अधिक व्याज मिळू शकतं.

  नवी दिल्ली, 10 जून : 21 जूनपासून देशातील सर्व 18 वर्षावरील लोकांचं केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर वॅक्सिनेशनबाबत सरकारची ही मोहिम वेगवान होण्याची आशा आहे. याचदरम्यान काही सरकारी बँकांनी लोकांमध्ये वॅक्सिनेशनबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी, स्पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. जर तुम्ही लस घेतली असेल, तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉजिटवर (FD) अधिक व्याज मिळू शकतं. काही सरकारी बँकांनी कोरोना वॅक्सिनेशनला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेतील रकमेवर अधिक व्याज देण्याचं सांगितलं आहे. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच लागू आॉहे. जर तुम्हीही बँकेतील ठेवीवर अधिक व्याज दराचा फायदा घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला वॅक्सिनचा एकतरी डोस घ्यावा लागेल. UCO बँक ऑफर - कोलकाता बेस्ड UCO बँकेने बँकेतील ठेवीवर अधिक व्याजाची ऑफर दिली आहे. कोरोना लशीचा किमान एक डोस घेतलेल्या अर्जदारांना 999 दिवसांच्या FD वर 30 बेसिस पॉईंट्स किंवा 0.30 टक्के अधिक व्याज दिलं जाईल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिनेशन ड्राईव्हसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी यूको बँक UCOVAXI-999 ऑफर देत आहे. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंतच लागू आहे.

  (वाचा - गृह मंत्रालयाचा अलर्ट! तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान)

  Central Bank of India -

  (वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

  याआधी सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियानेही (Central Bank of India) अशी ऑफर आणली होती. नुकतंच, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने इम्यून इंडिया डिपॉजिट स्किम (Immune India Deposit Scheme) लाँच केली होती. याअंतर्गत ज्या लोकांनी लशीचा डोस घेतला आहे, त्यांना सध्याच्या दरांच्या तुलनेत 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्के अधिक व्याज मिळतं. या स्किमची मॅच्युरिटी 1111 दिवसांची आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Bank, Corona vaccine, Coronavirus

  पुढील बातम्या