पाणीटंचाई जीवावर बेतली.. परळीत शॉक लागून एकाचा मृत्यू

पाणीटंचाई जीवावर बेतली.. परळीत शॉक लागून एकाचा मृत्यू

परळी शहरातील हलगे गल्लीत पाणीटंचाईने एकाचा बळी घेतली आहे. पाणी भरण्याच्या धावपळीत लोकांना जीव गमवावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास एकाचा मृत्यू झाला.

  • Share this:

बीड, 10 मे- परळी शहरातील हलगे गल्लीत पाणीटंचाईने एकाचा बळी घेतली आहे. पाणी भरण्याच्या धावपळीत लोकांना जीव गमवावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास एकाचा मृत्यू झाला. संजय राजाभाऊ विडेकर (वय-48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.संजय विडेकर हे हौदात उतरून पाणी भरत होते. त्यांना विद्युत मोटारीचा शॉक लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

नगर परिषदेकडून परळीत दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची साठवणूक करण्याची नागरिकांकडून धडपड केली जात आहे. यातूनच हौदात मोटार लावून पाणी भरताना वीजप्रवाहाचा शॉक लागून संजय विडेकर यांना प्राण गमावावा लागला.

विशेष म्हणजे नगराध्यक्षा सरोजिनीताई हालगे यांच्या प्रभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

संजय विडेकर हे पानटपरी चालवून उदरनिर्वाह भागवत होते. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. पाणी टंचाईच्या परिस्थितीने या व्यक्तीचा बळी घेतला नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.


SPECIAL REPORT: पवारांचा किल्ला ढासळणार की मजबूत होणार? हे समीकरण ठरवणार बारामतीचा खासदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या