नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : राज्य सरकारने सणापूर्वीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवून मोठी भेट दिली आहे. आता केंद्रीय कर्मचारी त्यांच्या DA (DA Hike) वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचा डीए वाढवू शकते. सरकारने मार्च 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये शेवटची वाढ केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने डीए दिला जात आहे. साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात DA/DR वाढ जाहीर केली जाते. सप्टेंबर महिना सुरू असून सण येणार असल्याने केंद्रीय कर्मचारी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या महिन्यात कधीही त्याची घोषणा होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. डीए 4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो रिपोर्टवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या डीए वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. यावेळी सांगण्यात येत आहे की डीएमध्ये 4 टक्के वाढ केली जाऊ शकते आणि दसऱ्यापूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून वाढीव महागाई भत्त्यासह पगार मिळणे अपेक्षित आहे. DA मध्ये वाढीचा दर सध्याच्या दराच्या 34% ते 38% पर्यंत असू शकतो अशी अपेक्षा आहे. पेन्शनधारकांसाठी डीआर दरवाढही अशीच अपेक्षा आहे. वाचा - PFचे पैसे जमा झाले नाहीत तर घाबरू नका, तक्रार कशी कराल जाणून घ्या DA हाईक कशी मोजली केली जाते? सरकार सहसा दर 6 महिन्यांनी DA/DR वाढीची गणना करते. जानेवारी आणि जुलै हे महिने यासाठी अनुकूल आहेत. 2006 पासून, महागाई भत्ता नवीन गणितावर आधारीत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी DA ची टक्केवारी = [(गेल्या 12 महिन्यांतील ऑल इंडिया कंज्युमर प्राईज इंडेक्सची (AICPI) सरासरी – 115.76/115.76]×100. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची टक्केवारी = (गेल्या 3 महिन्यांतील ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100)-126.33))x100 DA वर कर भरावा लागतो DA देखील कराच्या कक्षेत येतो. हा भाग ITR मध्ये स्वतंत्रपणे भरावा लागेल. यासाठी दोन श्रेणी आहेत. पहिला औद्योगिक महागाई भत्ता आणि दुसरा परिवर्तनीय महागाई भत्ता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.