मराठी बातम्या /बातम्या /मनी /सलग सातव्यांदा US फेडरल बँकेनं वाढवलं व्याजदर, तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम

सलग सातव्यांदा US फेडरल बँकेनं वाढवलं व्याजदर, तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम

महागाईचा सामना करण्यासाठी फेडचे पुढील वर्षी दर वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

महागाईचा सामना करण्यासाठी फेडचे पुढील वर्षी दर वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

महागाईचा सामना करण्यासाठी फेडचे पुढील वर्षी दर वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने सलग सातव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. अमेरिकेतील व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढून 4.5 टक्के झाले आहेत. महागाईचा सामना करण्यासाठी फेडचे पुढील वर्षी दर वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

फेडरल बँकेनं पुन्हा 2023 मध्ये हे दर वाढण्याचे संकेत दिले आहेत. यावरून जागतिक बाजारपेठेत मंदीचं सावट असल्याचं दिसत आहे. याचा परिणाम भारतावर आणि जगभरातील देशांवर कसा होणार आहे जाणून घेऊया.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, युरोपीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. क्रूड व्यवसाय देखील कोसळला आहे. पुढच्या वर्षी महागाई कमी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्व्हिसेसमध्ये महागाई वाढली आहे. त्यामुळे ही महागाई नियंत्रणात आणणं मोठं आव्हान आहे. बँक ऑफ इंग्लंड आपल्या पॉलिसी आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या पॉलिसीवर अपडेट देणार आहे. US, UK मध्ये मंदीचं सावट असल्याचं दिसत आहे.

SBI ग्राहकांना दणका! आजपासून या गोष्टीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

बँकेच्या पॉलिसी आणि होम लोन यावर नजर ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे मंदीचं सावट येऊ शकतं. दुसरं म्हणजे झपाट्याने वाढत जाणारी बेरोजगारी, ती 4 टक्क्यांहून अधिक वाढत गेली तर त्याचे परिणाम टेन्शन वाढवणारे असू शकतात.

आयात निर्यातीवर आणि सेवांवर याचा परिणाम कसा होतो ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. होम लोन आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर आयात होणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढणार का हे देखील पाहावं लागणार आहे.

लाडली लक्ष्मी योजना नेमकी काय? कोण घेऊ शकतं या योजनेचा लाभ

फेडच्या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात वाईट झाली आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 127 अंकांनी खाली कोसळला तर निफ्टी 33 अंकांनी कोसळला आहे. बँक निफ्टीने बुधवारी गुंतवणूकदारांना मालामाल केलं पण गुरुवारी सकाळी मात्र मोठी निराशा झाली. बँक निफ्टी देखील 0.15 टक्क्यांनी खाली घसरला आहे.

First published:

Tags: America, Rbi, Rbi latest news, Repo rate