जाहिरात
मराठी बातम्या / मनी / डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी BAD NEWS ! UPI ट्रान्झाक्शनवर येणार मर्यादा?

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी BAD NEWS ! UPI ट्रान्झाक्शनवर येणार मर्यादा?

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी BAD NEWS ! UPI ट्रान्झाक्शनवर येणार मर्यादा?

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एनपीसीआयने 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: कोरोनानंतर अनेक जण कॅशलेस आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे वळले. मोठ्या प्रमाणात UPI आणि वेगवेगळ्या पेमेंट अॅपचा वापर चालू झाला. तुम्हालाही जर ही सवय असेल तर त्यावर आताच नियंत्रण आणा. याचं कारण म्हणजे UPI ट्रान्झॅक्शनवर आता लिमिट लागण्याची शक्यता आहे. थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून (टीपीएपी) चालविण्यात येणाऱ्या युपीआय पेमेंट सेवेसाठी एकूण व्यवहाराची मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एनपीसीआयने 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. सध्या किती रुपयांपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आली नाही. अशा परिस्थितीत गुगल पे आणि फोनपे या दोन कंपन्यांचा मार्केट शेअर वाढून सुमारे 80 टक्के झाला आहे.

ना फोनपे, ना गुगल पे, आता Whatsapp वरून पाठवा पैसे, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

नोव्हेंबर 2022 मध्ये, एनपीसीआयने मक्तेदारीचा धोका टाळण्यासाठी टीपीएपी 30 टक्के व्यवहारांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव दिला होता. याबाबत सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत एनपीसीआयच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अर्थ मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. या अहवालानुसार, सध्या एनपीसीआय सर्व शक्यतांचे मूल्यमापन करत असून ३१ डिसेंबरची मुदत वाढविण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट, घरबसल्या शून्य मिनिटांत भरा वीज बिल
News18लोकमत
News18लोकमत

‘एनपीसीआय’ला उद्योगातील भागधारकांकडून मुदत वाढवून देण्याबाबत विनंत्या प्राप्त झाल्या असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिनाअखेरपर्यंत यूपीआय पेमेंटवर मर्यादा लावण्यात येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात