मुंबई, 12 नोव्हेंबर: इंटरनेटशिवायही तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सुविधा वापरू शकता. तुम्ही तुमचं मोबाइल बिल इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI द्वारे देखील भरू शकता. 123PAY UPI सेवेच्या मदतीनं तुम्ही हे करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने (NPCI) अलीकडेच जाहीर केलं आहे की 123PAY वीज बिल भरणा सेवा आता 70 पेक्षा जास्त वीज मंडळांसाठी उपलब्ध असेल. 123PAY सेवा आणि भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) वापरून, ग्राहक त्यांचे वीज बिल जलद आणि सहज भरू शकतील. वीज बिल थेट बँक खात्यातून भरता येतं.
या स्टेप्स करा फॉलो-
हेही वाचा: कमी गुंतवणुकीत रोज हजार रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ व्यवसाय
123PAY UPI सेवा काय आहे?
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फीचर फोनसाठी 123PAY UPI सेवा तयार केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू केली होती. 123PAY सेवेच्या मदतीनं फीचर फोन वापरणारे डिजिटल व्यवहार करू शकतात. यामध्ये फोन, मिस्ड कॉल ऑन इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्सच्या माध्यमातून ध्वनी आधारित प्रणालीची मदत घेता येईल. UPI पिन हा 4 ते 6 अंकी कोड असतो, जो तुम्ही मोबाईल अॅप किंवा IVR किंवा इतर कोणत्याही चॅनेलवर पहिल्यांदा नोंदणी करताना तयार करता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online payments, Payment