इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक प्रामुख्यानं चॅट करण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्म वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की व्हॉट्सअॅप केवळ चॅटसाठीच नाही तर पेमेंट करण्यासाठीही उपयुक्त आहे.
तुम्ही Whatsapp Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. व्हॉट्सअॅपची ही सेवा यूपीआयवर आधारित आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं बँक खातं लिंक करून मित्राला पैसे पाठवू शकता किंवा दुकानदाराला पैसे देऊ शकता.
व्हाट्सअॅप पेसाठी नोंदणी करण्यासाठी, प्रथम व्हाट्सअॅप उघडा. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स मेनू निवडा. 'पेमेंट' पर्याय निवडा. ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘Add Payment Method’ निवडा.
आता ज्या बँकेत तुमचं खातं आहे ती निवडा. त्यानंतर WhatsApp तुमचा फोन नंबर वेरिफिकेशन होईल. हे तुमचं निवडलेलं बँक खातं देखील दर्शवेल. तुमचं बँक खातं निवडा आणि Done बटण दाबा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमचा UPI आयडी, पेमेंट हिस्ट्री आणि लिंक केलेली बँक खाती पाहू शकाल.