मुंबई, 8 डिसेंबर : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) अर्थात यूपीआयने (UPI) आजच्या जगात आर्थिक देवघेव फारच सोपी करून टाकली आहे. मात्र, ही सोय प्रामुख्याने स्मार्टफोन्सवर (Smartphones) वापरणं अधिक सोपं आहे. फीचर फोन आणि इंटरनेटशिवायही यूपीआय पेमेंट (Feature Phones) करता येतं. मात्र, ते तितकंसं सुलभ नाही. स्मार्टफोन्सवर वेगवेगळ्या प्रकारची अॅप्स असल्याने यूपीआय पद्धतीने पेमेंट करणं सोपं जातं. आता फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी यूपीआयवर आधारित पेमेंटकरिता काही विशेष प्रॉडक्ट्स सादर केली जाणार असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी बुधवारी (8 डिसेंबर) जाहीर केलं.
'स्टेटमेंट ऑन डेव्हलपमेंटल अँड रेग्युलेटरी पॉलिसीज' अर्थात विकासात्मक आणि नियामक धोरणांबद्दलचा अहवाल आज (8 डिसेंबर) जाहीर झाला. छोट्या रकमांचे व्यवहारांची सुलभात वाढवण्याचा, तसंच फीचर फोन्समधून यूपीआय पेमेंट्सची लोकप्रियता वाढवण्याचे प्रस्ताव त्यात जाहीर करण्यात आले.
रिझर्व्ह बँकेच्या रिटेल डायरेक्ट स्कीमअंतर्गत, तसंच, आयपीओ अॅप्लिकेशनसाठी यूपीआय पेमेंट्सच्या व्यवहारांची मर्यादा दोन लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणाही गव्हर्नर दास यांनी केली. रिटेल डायरेक्ट स्कीममधून गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेकडे ग्लिट सिक्युरिटीज अकाउंट उघडून सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणं शक्य आहे.
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी स्वस्त; काय आहेत नवे दर?
वॉलेट्स, कार्ड्स, यूपीआय अशा विविध पेमेंट सिस्टीममध्ये (Payment System) आकारल्या जाणाऱ्या शुल्कांबद्दल चर्चा करणारा अहवाल रिझर्व्ह बँकेतर्फे प्रकाशित केला जाईल, असंही दास यांनी स्पष्ट केलं.
छोट्या रकमेचे व्यवहार सुलभ होण्यासाठी यूपीआयमध्ये ऑन डिव्हाइस वॉलेटना (On Device Wallet) परवानगी दिली असल्याचं दास यांनी स्पष्ट केलं. रिटेल पेमेंट्स सेग्मेंटमध्ये यूपीआय पेमेंट्सचा टक्का वाढवण्यासाठी हे उपयुक्त ठरेल, असंही त्यांनी सांगितलं.
दरमहा या योजनेत करा 1000 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 12 लाख; वाचा काय आहे स्कीम
बँकांना त्यांच्या परदेशांमधल्या शाखांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यातून नफा कमावण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेची परवानगी आधी घेतली नाही तरी चालणार आहे, अशी घोषणाही दास यांनी केली.
रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो रेट चार टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवला.
सर्वसमावेशक धोरण कायम ठेवण्यासाठी मॉनेटरी पॉलिसी कमिटीने 5:1 च्या बहुमताने आणि महत्त्वाचे व्याजदरांत बदल करण्यासाठी एकमताने निर्णय घेतला, असं दास यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news, Upi