Home /News /money /

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी स्वस्त; काय आहेत नवे दर?

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी स्वस्त; काय आहेत नवे दर?

आज सोन्याच्या दरात (Gold Price today) 177 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver Rate today) प्रति किलो 1112 रुपयांची घसरण झाली आहे.

    मुंबई, 8 डिसेंबर : लग्नसराईचा काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी (Gold Shopping) केली जाते. त्यामुळे सध्या सोन्याचे दर काय आहेत याची माहिती अनेकांना हवी असते. सोन्याचे दर रोज बदलतात, मात्र अजूनही सोन्याचे दर (Gold Rate) उच्चांकी किमतीपेक्षा कमीच आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्ली सराफा बाजारात 8 डिसेंबर रोजी सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. आज सोन्याच्या दरात (Gold Price today) 177 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver Rate today) प्रति किलो 1112 रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीत सोन्याचा भाव 177 रुपयांनी वाढून 47,267 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 1112 रुपयांनी घसरून 60,533 रुपये प्रति किलो झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोने 47,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61,645 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तुमच्या खिशातली 500 रुपयांची 'ती' नोट खोटी आहे? तथ्य जाणून घ्या मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर खरं कारण समोर सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या