मुंबई, 26 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी काही बदल झाला नव्हता. आज गुरुवारी मात्र या किमती वाढल्यात. दिल्लीत पेट्रोल 6 पैसे आणि डिझेल 7 पैसे प्रति लीटर वाढलंय. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज (26सप्टेंबर) दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 74.19 रुपये, 79.85 रुपये, 76.88 रुपये आणि 77.12 रुपये प्रति लीटर झालेत. चारही महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 67.14 रुपये, 70.44 रुपये, 69.56 रुपये आणि 70.98 रुपये प्रति लीटर झालंय. रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. 30 सप्टेंबरच्या आत ‘असं’ लिंक करा पॅन आणि आधार कार्ड, नाही तर होईल मोठं नुकसान इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिला सावधानतेचा इशारा, ‘हा’ मेसेज आहे खोटा अशी मिळवा माहिती विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय, ‘हे’ आहेत टाॅप 5 उद्योगपती एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील. काल दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर 74.13 रुपये, 79.79 रुपये, 76.82 रुपये आणि 77.06 रुपये प्रति लीटर होते. चार महानगरांमध्ये डिझेलचे दर 67.07 रुपये, 70.37 रुपये, 69.49 रुपये आणि 70.91 रुपये प्रति लीटर होते. हेल्मेट घालून आलेल्या तरुणानं झाडल्या एकामागोमाग गोळ्या, हत्येचा CCTV VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







