मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय, 'हे' आहेत टाॅप 5 उद्योगपती

मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय, 'हे' आहेत टाॅप 5 उद्योगपती

Mukesh Ambani - मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय ठरलेत. या यादीत आणखी कोण आहेत ते पाहा

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. ते आठव्यांदा या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती आहे 3.80 लाख कोटी रुपये. ही श्रीमंत भारतीयांची यादी आयआयएफएल वेल्थ हुरून इंडियानं सादर केलीय.

या यादीत लंडनमध्ये राहणारे एसपी हिंदुजा आणि त्यांचं कुटुंब 1,86,500 कोटी रुपयांच्या संपत्तीनं दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर नंबर लागतो विप्रोच्या अजिम प्रेमजी यांचा. त्यांची एकूण संपत्ती 1,17,100 कोटी आहे.तसंच लक्ष्मी निवास मित्तल 1,07,300 कोटी रुपयांच्या संपत्तीनं चौथ्या स्थानावर आणि 94,500 कोटी रुपयांच्या संपत्तीमुळे गौतम अदानी पाचव्या स्थानावर आहेत.

सोन्या-चांदीच्या किमती वधारल्या, 'हे' आहेत बुधवारचे दर

या यादीत ज्यांची संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे असे 953 जण आहेत. गेल्या वर्षी 831 भारतीयांकडे 1000 कोटी रुपयांहून जास्त संपत्ती होती.

या यादीत उदय कोटक सहाव्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 94,100 कोटी रुपये संपत्ती आहे.सायरस एस पुनावाला यांच्याकडे 88,800 कोटी रुपये संपत्ती आहे. ते 7व्या स्थानावर आहेत. सायरल पल्लोनजी मिस्त्री आठव्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 76,800 कोटी रुपये संपत्ती आहे. शापोरजी पल्लोनजी 76,800 कोटी रुपयांच्या संपत्तीबरोबर नवव्या स्थानावर आहेत. दिलीप सांघवींकडे 71,500 कोटी रुपये संपत्ती आहे. ते 10व्या स्थानावर आहेत.

प्लॅस्टिक बंदीनंतर 1 लाख रुपये गुंतवा आणि सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल भरपूर कमाई

ओयो रुम्सचे रितेश अग्रवाल 7500 कोटी रुपयांच्या संपत्तीमुळे अब्जाधीश आहेत. ते 25 वर्षांचे सर्वात कमी वयाचे श्रीमंत आहेत. तर मीडिया नेटचे दिव्यांक तुराखिया 37व्या वर्षीच सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत.

1 ऑक्टोबरपासून SBI च्या खात्यात पैसे जमा करण्याचे आणि काढण्याचे बदलले नियम

या यादीत 152 स्त्रिया आहेत. एचसीएल टेक्नाॅलाॅजीची 37 वर्षांची रोशनी नडार सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहे. त्यानंतर नंबर लागतो गोदरेज समूहाच्या स्मिता व्ही. कृष्णाचा. त्यांची एकूण संपत्ती 31,400 कोटी रुपये आहे. या यादीत बायाॅकाॅनच्या किरण मजुमदारही आहेत.

हा व्हायरल VIDEO पाहिल्यावर तुम्ही आलं विकत घेणार नाही!

Published by: Sonali Deshpande
First published: September 25, 2019, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading