इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिला सावधानतेचा इशारा, 'हा' मेसेज आहे खोटा

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं दिला सावधानतेचा इशारा, 'हा' मेसेज आहे खोटा

Income Tax - इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं खोट्या मेसेजेसपासून सावध राहायला सांगितलंय

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सर्वांना सावधानतेचा इशारा दिलाय. डिपार्टमेंटनं ITR भरण्याची डेडलाइन वाढवल्याचे जे मेसेज येतायत ते खोटे असल्याचं सांगितलंय.इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं ट्वीट करून टॅक्स भरायची डेडलाइन वाढवली नसल्याचं म्हटलंय.

फेक न्यूजमध्ये फसू नका

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलंय की, ITR भरण्याची तारीख वाढवल्याचे मेसेज फिरतायत. ते खोटे आहेत. या वायरल मेसेजमध्ये असं म्हटलंय की IT रिटर्न भरण्याची तारीख 30 सप्टेंबरवरून 15 ऑक्टोबर केलीय. पण IT डिपार्टमेंटनं म्हटलंय हे खोटं आहे. डेडलाइन 30 सप्टेंबरच आहे.

हे वाचा - PMC बँकेच्या कारवाईनंतर या 9 बँका बंद होणार का? RBI ने केला खुलासा

यांच्यासाठी अंतिम तारीख आहे 30 सप्टेंबर

एखाद्या फर्मचा वर्किंग पार्टनर, व्यक्ती किंवा ऑडिटिंगची गरज असणारे इतर अकाउंट्स यांच्यासाठी ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. ज्यांना सेक्शन 92 ईद्वारे रिपोर्ट द्यावा लागतो त्यांच्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.

हे वाचा - 1 ऑक्टोबरपासून SBI च्या खात्यात पैसे जमा करण्याचे आणि काढण्याचे बदलले नियम

अगोदर आयटी रिटर्नची तारीख 31 ऑगस्ट होती. ती नंतर 30 सप्टेंबर केली गेली.

ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

-----------

VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

Published by: Sonali Deshpande
First published: September 25, 2019, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading