मोदी सरकारचा मोठा निर्णय, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 8वी उत्तीर्ण गरजेचं नाही

रोजगार वाढवण्यासाठी सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्सच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केलेत

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 04:03 PM IST

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 8वी उत्तीर्ण गरजेचं नाही

मुंबई, 19 जून : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. रोजगार वाढवण्यासाठी सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्सच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केलेत. मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी किंवा रिन्यू करण्यासाठी 8वी उत्तीर्ण असल्याचं अनिवार्य नाही. सेंट्रल मोटर व्हेइकलच्या नियमानुसार ड्रायव्हर बनण्यासाठी 8वी उत्तीर्ण गरजेचं होतं.

8वी उत्तीर्ण अनिवार्य नाही

या नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय की, गरीब लोकांना आयुष्यभर रोजगार मिळावा म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शिवाय वाहतूक क्षेत्रामध्ये 22 लाख ड्रायव्हर्सची कमतरता आहे ती पूर्ण होईल.

भारतीय रेल्वेत बंपर व्हेकन्सीज्, लवकर करा अर्ज

लवकरच जारी होईल अधिसूचना

Loading...

मंत्रालयाकडून सांगितलं गेलंय  की जे लोक 8वी उत्तीर्ण नाहीत आणि त्यांना लायसन्स हवंय, ते आता लायसन्स घेऊ शकतात. लवकरच याची अधिसूचना जारी केली जाईल. या नियमात बदल करताना हेही सांगितलं गेलंय की, रस्त्ता सुरक्षेमध्ये काही बदल केले जाणार नाहीत. कमी शिकलेल्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांना रस्ता सुरक्षेचे नियम सांगितले जातील.

खिशाला परवडणारा विमान प्रवास ! 'विस्तारा'च्या आकर्षक ऑफर्स

हरियाणा सरकारची शिफारस

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ड्रायव्हर्सना शैक्षणिक पात्रतेत सवलत द्यावी, अशी शिफारस केली होती. नियमामुळे 20 हजाराहून जास्त ड्रायव्हर्स लायसन्स रिन्यू करू शकत नव्हते.

विरोधकांपेक्षा एकनाथ खडसेच जास्त आक्रमक, सरकारवर केली प्रश्नांची सरबत्ती

ड्रायव्हर्सना देणार प्रशिक्षण

मंत्रालयानं ड्रायव्हरच्या ट्रेनिंगवर जोर दिलाय. रस्ता सुरक्षा महत्त्वाचीच आहे. म्हणून ड्रायव्हर्सना कडक प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्यांच्यातलं ड्रायव्हिंग कौशल्य पाहिल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाणार नाही.VIDEO: आठवलेंच्या कवितेमुळे तुफान हशा! मोदी आणि राहुल गांधीही खळखळून हसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...