नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आज तेजी पाहायला मिळते आहे. अनेक दिवसांच्या घसरणीनंतर आज या मौल्यवान धातूंचे दर किरकोळ वाढले आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange) वर आज सकाळी एप्रिलच्या सोन्याची वायदे किंमत 239.00 रुपयांनी वाढून 48,078.00 रुपयांवर पोहोचली आहे. तर मार्चच्या चांदीची वायदे किंमत 321.00 रुपयांच्या तेजीमुळे 70,405.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्यामध्ये तेजी जारी आहे. मंगळवारी अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 12.32 डॉलरने वाढून 1,842.28 डॉलर प्रति औंस झाले होते. तर चांदीचे दर 0.28 डॉलरने वाढून 27.54 डॉलर या स्तरावर पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये असणारे आजचे सोन्याचांदीचे दर -22 कॅरेट गोल्ड प्राइस - 46190 रुपये प्रति तोळा -24 कॅरेट गोल्ड प्राइस - 50390 रुपये प्रति तोळा -सिल्वर प्राइस - 70200 रुपये प्रति किलो (हे वाचा- आठवड्यातून 4 दिवसच करावं लागणार काम, मोदी सरकार आखतंय अशी योजना ) सोमवारी काय होते दर? दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 94 रुपयांनी वाढले होते. यानंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,877 रुपये प्रति तोळा झाले होते. तर सोमवारी चांदी देखील महागली होती. चांदीचे भाव काल 340 रुपयांनी वाढून 68,391 रुपये प्रति किलो झाले होते. (हे वाचा- CM केजरीवालांच्या मुलीची OLX वर फसवणूक, ऑनलाइन सोफा विकताना 34000 रुपयांचा गंडा ) सोन्याचे दर आणखी वाढणार का? Prithvi Finmart चे डायरेक्टर मनोज जैन यांच्या मते, सोन्याचांदीच्या दरात अशाप्रकार चढउतार चालूच राहणार आहे. मनीकंट्रोलशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर 1858 डॉलर आणि चांदीचे दर 28.55 डॉलर या स्तरावर पोहोचू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.