Home /News /money /

मिळणार कमाईची सुवर्णसंधी! आणखी दोन मोठ्या कंपन्यांच्या आयपीओला SEBI ची मंजुरी

मिळणार कमाईची सुवर्णसंधी! आणखी दोन मोठ्या कंपन्यांच्या आयपीओला SEBI ची मंजुरी

Upcoming IPO: मार्केट रेग्युलेटर सेबीनं (SEBI) सोमवारी (10 जानेवारी 2022) आणखी दोन कंपन्यांना त्यांचा आयपीओ (Upcoming IPO) आणण्यास मान्यता दिली आहे. जाणून घ्या या कंपन्यांविषयी

नवी दिल्ली, 11 जानेवारी: मार्केट रेग्युलेटर सेबीनं (SEBI) सोमवारी (10 जानेवारी 2022) आणखी दोन कंपन्यांना त्यांचा आयपीओ (Upcoming IPO) आणण्यास मान्यता दिली आहे. फाईव्ह-स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड (Five-Star Business Finance Limited IPO) आणि वारी एनर्जीज लिमिटेड (Waaree Energies Limited IPO) अशा या दोन कंपन्या आहेत. फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी आहे तर, वारी एनर्जी लिमिटेड ही सोलर एनर्जी (Solar Energy) क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. सेबीनं सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अपडेटनुसार, दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 दरम्यान आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. या दोन्ही कंपन्यांना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सेबीकडून ‘ऑब्झर्व्हेशन लेटर’ (Observation letter) मिळालं होतं. आयपीओ आणण्यासाठी कोणत्याही कंपनीला सेबीकडून हे लेटर मिळवणं आवश्यक असतं. फाईव्ह-स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेडचे आयपीओ मनीकंट्रोलनं दिलेल्या बातमीनुसार, टीपीजी (TPG), मॅट्रिक्स पार्टनर्स (Matrix Partners), नॉरवेस्ट व्हेंचर्स (Norwest Ventures, Sequoia) आणि केकेआरसारख्या (KKR) मोठ्या गुंतवणूकदारांनी फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे. आपल्या आयपीओमधून दोन हजार 752 कोटी रुपये उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीचे आयपीओ 'ऑफर-फॉर-सेल'मध्ये (OFS) उपलब्ध असणार आहेत. ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर ग्रुपच्या कंपन्या आपापले शेअर्स विकतील. हे वाचा-Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत, कंपनीच्या शेअरहोल्डर्सपैकी एससीआय इन्व्हेस्टमेंट-व्हीचे 257.10 कोटी रुपये, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स II एलएलसीचे 568.92 कोटी रुपये, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया इन्व्हेस्टमेंट्स II एक्स्टेंशन एलएलसीचे 9.56 कोटी रुपये, नॉर्वेस्ट व्हेंचर पार्टनर्स एक्स-मॉरिशसचे 385.65 कोटी रुपये, टीपीजी एशिया VII SF पीटीई लिमिटेडचे एक हजार 349.78 कोटी रुपये आणि इतर प्रमोटर ग्रुप कंपन्यांचे 180.93 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. सध्या, फाईव्ह स्टारच्या बिझनेसचा 20.99 टक्के हिस्सा टीपीजी एशियाचा, 14 टक्क्यांहून अधिक हिस्सा मॅट्रिक्स पार्टनर्सकडे, 10.22 टक्के हिस्सा नॉर्वेस्ट व्हेंचरकडे आणि 8.83 टक्के हिस्सा एससीआय इन्व्हेस्टमेंटकडं आहे. वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ वारी एनर्जीजच्या आयपीओमध्ये, एक हजार 350 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. याशिवाय ऑफर-फॉर-सेलमध्ये (OFS) 40 लाख 7 हजार 500 इक्विटी शेअर्स कंपनीचे विद्यमान शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्स विक्रीसाठी आणणार आहेत. ऑफर-फॉर-सेलअंतर्गत, हितेश चिमणलाल दोशी, वीरेनकुमार चिमणलाल दोशी आणि महावीर थर्मोइक्विप प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने 13 लाख 15 हजार इक्विटी शेअर्स, समीर सुरेंद्र शाहच्या वतीने 40 हजार इक्विटी शेअर्स आणि नीलेश गांधी व द्रष्टा गांधींच्या वतीनं 22 हजार 500 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. हे वाचा-IOCL ने जारी केले पेट्रोलचे नवे दर, 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील? कंपनीच्या आयपीओमधून मिळणाऱ्या 978.36 कोटी रुपयांचा वापर गुजरातमधील चिखली येथील 2 गिगावॅट (GW) वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या सौर सेल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी आणि 184.23 कोटी रुपयांचा वापर एक गिगावॅट (GW) उत्पादन निर्मिती क्षमता असलेल्या सौर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी केला जाणार आहे.
First published:

Tags: Investment, Money

पुढील बातम्या