Home /News /money /

Petrol Price Today: IOCL ने जारी केले नवे दर, तुमच्या शहरात 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Price Today: IOCL ने जारी केले नवे दर, तुमच्या शहरात 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price Today 11 January 2022) जारी केले आहेत. दरम्यान आज मंगळवारी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

    मुंबई, 11 जानेवारी: सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price Today 11 January 2022) जारी केले आहेत. दरम्यान आज मंगळवारी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवीन दरानुसार देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत.  मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घरबसल्या तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-कर्मचाऱ्यांच्या संपामुळे फेब्रुवारीत 'या' दोन दिवशी बँकांचं कामकाज होणार ठप्प! महाराष्ट्रातील इंधनाचे दर मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.70 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.48 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.70 रुपये92.48 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक110.39 रुपये93.15 रुपये
    नागपूर110.06 रुपये92.86 रुपये
    अहमदनगर109.65 रुपये92.45 रुपये
    औरंगाबाद110.84 रुपये93.58 रुपये
    रत्नागिरी111.68 रुपये94.42 रुपये
    रायगड109.46 रुपये92.23 रुपये
    परभणी112.18 रुपये94.88 रुपये
    पालघर110.26 रुपये94.88 रुपये
    सांगली109.65 रुपये92.47 रुपये
    कोल्हापूर110.13 रुपये92.93 रुपये
    हे वाचा-Air India कडून प्रवाशांना दिलासा, विमान प्रवासाची तारीख ‘विनामूल्य’ बदलता येणार सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol price, Sharp rise of petrol and diesel prices

    पुढील बातम्या