सुप्रिया सुळेंची राज्याच्या राजकारणात एण्ट्री? दिल्लीतील घडामोडींनंतर नवी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 10:30 AM IST

सुप्रिया सुळेंची राज्याच्या राजकारणात एण्ट्री? दिल्लीतील घडामोडींनंतर नवी चर्चा

मुंबई, 27 जून : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर आता काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं, यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव झाली याबाबत मोठी चर्चाही रंगली. पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत खुलासा केला आहे. राहुल गांधींसोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत पुढाकार घेतल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. कारण आतापर्यंत राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत तर राज्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष घालत असत. पण आता सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधी यांच्यासोबत खलबतं केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात येण्यास इच्छुक आहेत का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची मिशन 'यंग ब्रिगेड'

'लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल,' असं म्हणत शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षसंघटनेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

Loading...

'नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी,' अशी सूचनाही पवारांनी केली.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नव्या तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. प्रस्थापित आणि गेली अनेक वर्ष सत्तेचा मलिदा खाणाऱ्या नेत्यांचा लोकांना कंटाळा आलाय. याची जाणीव शरद पवारांना झाली आहे. या नेत्यांवर लोकांचा राग असल्याने पक्षाची दुरावस्था झाली. त्यामुळे जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने जुन्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

VIDEO: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...