Home /News /money /

आता आधारप्रमाणे मिळणार यूनिक हेल्थ कार्ड, उपचाराचीही होणार नोंद

आता आधारप्रमाणे मिळणार यूनिक हेल्थ कार्ड, उपचाराचीही होणार नोंद

डिजीटल हेल्थ मिशनअंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचं यूनिक हेल्थ कार्ड बनवणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजीटल असणार असून ते आधार कार्डप्रमाणेच दिसेल.

  नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : डिजीटल हेल्थ मिशनअंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचं यूनिक हेल्थ कार्ड बनवणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजीटल असणार असून ते आधार कार्डप्रमाणेच दिसेल. या कार्डवर आधार कार्डप्रमाणे एक नंबर मिळेल. या नंबरद्वारे डॉक्टरांना आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीचा संपूर्ण रेकॉर्ड समजेल. यूनिक कार्डद्वारे व्यक्तीने कुठे-कुठे इलाज केला आहे, त्या व्यक्तीच्या आरोग्यासंबंधी संपूर्ण माहिती या यूनिक हेल्थ कार्डमध्ये असेल. या कार्डचा फायदा म्हणजे रुग्णाला आपल्यासोबत फाईल्स घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. डॉक्टर किंवा रुग्णालय रुग्णाचं यूनिक हेल्थ कार्ड पाहून त्याचा संपूर्ण डेटा काढतील आणि आरोग्यासंबंधी इतरही माहिती मिळेल. त्याचआधारे पुढील इलाज केला जाईल. या कार्डद्वारे व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे, तेदेखील समजेल. रुग्णाला आयुष्मान भारतअंतर्गत इलाजासाठी या सुविधांचा लाभ मिळतो की नाही या यूनिक कार्डद्वारे समजेल.

  सामान्यांना दिलासा! खाद्यतेल होणार स्वस्त, मोदी सरकारचा हा निर्णय ठरेल फायद्याचा

  काय आहे यूनिक हेल्थ कार्ड - यूनिक हेल्थ आयडीअंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यासंबंधी डेटाबेस तयार करेल. या आयडीसह त्या व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दाखल केला जाईल. या आयडीद्वारे व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दिसेल. एखाद्या डॉक्टरकडे रुग्ण गेल्यास आणि आपलं हेल्थ आयडी दाखवल्यास, त्या रुग्णावर आधी कुठे आणि कोणते इलाज झाले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, कोणती औषधं घेतली याची माहिती डॉक्टरांना समजेल.

  तुमच्याकडे आहे फाटक्या किंवा खराब नोटा? जाणून घ्या बदलून घेण्याची प्रक्रिया

  या सुविधेअंतर्गत सरकार लोकांना इलाजासाठी मदत करण्यास सक्षम असेल. कोणता व्यक्ती कोणत्या श्रेणीमध्ये येतो, त्याची आर्थिक स्थिती काय आहे, याबाबत सरकारला डेटाबेसची माहिती मिळेल. त्याआधारे सरकार सब्सिडी इत्यादींचा लाभ देऊ शकेल. https://healthid.ndhm.gov.in/register यावर स्वत:चे रेकॉर्ड रजिस्टर्ड करुन हेल्थ आयडी बनवता येऊ शकतं.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या