Home /News /money /

5G Services : दिवाळीपर्यंत नागरिकांना 5G ची भेट मिळण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

5G Services : दिवाळीपर्यंत नागरिकांना 5G ची भेट मिळण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

5G Spectrum : देशात टेलिकॉम क्रांतीची नवी सुरुवात झाली आहे. दूरसंचार मंत्रालय या आठवड्यापासून इच्छुक दूरसंचार कंपन्यांकडून अर्ज मागवणार आहे. जुलैअखेर लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.

    मुंबई, 15 जून : मोबाईल इंटरनेट यूजर्स 4G नंतर आता 5G ची (5G Telecom Service) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सर्व यूजर्सची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) 5G सेवा लवकरच सुरु करण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. देशात 5G सेवा सुरू करण्याच्या दिशेने केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Spectrum Auction) मंजुरी दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्व काही सुरळीत राहिल्यास यंदाच्या दिवाळीपर्यंत (Diwali 2022) देशवासीयांना 5G टेलिकॉम सेवेची भेट मिळू शकते. 'अमर उजाला'ने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. 5G सेवा 20 वर्षांसाठी चालवण्यासाठी, सरकार जुलै अखेरीस एकूण 72097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूरसंचार विभागाच्या स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लिलावातील यशस्वी बोलीदारांना देशातील सार्वजनिक आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी स्पेक्ट्रमचा परवाना दिला जाईल. याआधी, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) ने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली होती. देशातील दूरसंचार कंपन्या बऱ्याच दिवसांपासून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची वाट पाहत आहेत. Term Deposit: SBI सह 'या' बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ, ग्राहकांना होणार फायदा लिलावातून 5 लाख कोटी मिळण्याची अपेक्षा देशात टेलिकॉम क्रांतीची नवी सुरुवात झाली आहे. दूरसंचार मंत्रालय या आठवड्यापासून इच्छुक दूरसंचार कंपन्यांकडून अर्ज मागवणार आहे. जुलैअखेर लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत सरकार नऊ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार? 2500 मेगाहर्ट्झ बँडसाठी अर्ज करू शकतात या लिलावात टेलिकॉम कंपन्या 600 ते 1800 मेगाहर्ट्झ बँड आणि 2100, 2300, 2500 मेगाहर्ट्झ बँडच्या लिलावासाठी अर्ज करतील. भारत सरकारने आधीच 5G स्पेक्ट्रमच्या कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंगसह प्रगत सेवांची चाचणी घेतली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावात यशस्वी होणाऱ्या कंपन्यांना कोणतीही आगाऊ रक्कम भरावी लागणार नाही. रक्कम 20 समान हप्त्यांमध्ये भरण्यास ते सक्षम असतील. त्यांना बँक हमीतूनही दिलासा देण्यात आला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Internet, Telecom service, Union cabinet

    पुढील बातम्या