जाहिरात
मराठी बातम्या / मनी / येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार?

येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार?

येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार?

व्याजदरात अपेक्षेप्रमाणे वाढ होत राहिल्यास ग्राहकांना महागड्या ईएमआयसाठी तयार राहावे लागेल. गृहकर्ज सध्या विक्रमी नीचांकी पातळीवर चालू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जून : रिझर्व्ह बँक (Reserve bank Of India) डिसेंबरपर्यंत व्याजदर 5.9 टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे अमेरिकन रेटिंग एजन्सी फिच रेटिंगने (Fitch Ratings) बुधवारी सांगितले. चलनवाढीची ढासळलेली परिस्थिती पाहता मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ करत राहणार आहे. ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुकच्या अपडेटमध्ये, फिचने म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) बिघडत चाललेले बाह्य वातावरण, वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कडक जागतिक आर्थिक धोरणाचा सामना करत आहे. महागाईचा (Inflation) ढासळणारा दृष्टीकोन लक्षात घेता, आरबीआय डिसेंबर 2022 पर्यंत व्याजदर 5.9 टक्के आणि 2023 च्या अखेरीस 6.15 टक्क्यांवर नेण्याची अपेक्षा करतो, असे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. 2024 मध्ये ते अपरिवर्तित राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. शेअर बाजारात सुरु असलेल्या पडझडीत गुंतवणूकदारांनी काय करावं? ऐका तज्ज्ञांचा सल्ला वाढती महागाई हा चिंतेचा विषय गेल्या महिन्यात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.4 टक्क्यांवर नेले. त्यानंतर गेल्या आठवड्यात .50 टक्क्यांच्या वाढीसह व्याजदर 4.9 टक्क्यांवर आणण्यात आले. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई 7.04 टक्क्यांवर आली. जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आरबीआय व्याजदरात वाढ करत राहणार असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महागाई आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे फिचने म्हटले आहे. ते इतर क्षेत्रांमध्येही पसरले आहे, जे ग्राहकांसाठी एक गंभीर आव्हान आहे. गेल्या तीन महिन्यांत, अन्नधान्य महागाई दरवर्षी सरासरी 7.3 टक्क्यांनी वाढला आहे, तर आरोग्य सेवा बिलेही त्याच वेगाने वाढत आहेत. फिचच्या मते, मार्चच्या उत्तरार्धात कोविड-19 प्रकरणे कमी झाल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीतील वाढीमुळे उपभोगात सुधारणा होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे 70 टक्के नुकसान, कोणत्या करन्सीमध्ये किती पैसे बुडाले? विकास दर प्रभावित होईल यावर्षी (2022-23) अर्थव्यवस्था 7.8 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा करतो, आमच्या पूर्वीच्या 8.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे, असं फिचने म्हटलं आहे. आमच्या मार्चच्या 4.8 टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी वार्षिक 4.1 टक्के वाढला. व्याजदरात अपेक्षेप्रमाणे वाढ होत राहिल्यास ग्राहकांना महागड्या ईएमआयसाठी तयार राहावे लागेल. गृहकर्ज सध्या विक्रमी नीचांकी पातळीवर चालू आहे. पण गेल्या 40 दिवसांत 0.90 टक्के व्याजदर वाढल्याने ईएमआय वाढू लागला आहे. जर व्याज दर 6 टक्क्यांपर्यंत पोहोचला तर तुम्हाला येथून सुमारे 2 टक्के अधिक व्याज द्यावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात