Union Budget 2019 : 20 रुपयांच्या नाण्यांची ही असेल खासीयत

Union Budget 2019 : 20 रुपयांच्या नाण्यांची ही असेल खासीयत

Union Budget 2019 : 20 रुपयांची नाणी लवकरच उपलब्ध होणार आहेत

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Budget 2019 सादर केलं. यावेळी त्यांनी 1,2,5,10 आणि 20 रुपयांची नवी नाणी आणली जातील, असं सांगितलं. ही नाणी अंध व्यक्तींना स्पर्शानं ओळखता येतील. अर्थमंत्री म्हणाल्या, 7 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही नाणी जारी केली. ही लवकरच सार्वजनिकपणे उपलब्ध होतील.

आपल्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी पुढील पाच वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Union Budget 2019 : बजेटनंतर शेअर मार्केट गडगडलं

Union Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर

दरम्यान, आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय, या घरांमध्ये गॅस, वीज आणि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली. 114 दिवसांत आता एक घरं बांधलं जात असल्याची माहिती यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली.

Union Budget 2019 : पेट्रोल, डिझेल आणि सोनंही झालं महाग

यापूर्वी देखील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी 2.67 लाखांची सबसिडी सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2022 पर्यंत सर्वांना हक्काचं घर देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली.

Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता.

Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

First published: July 5, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading