Union Budget 2019 : बजेटनंतर शेअर मार्केट गडगडलं, निफ्टी-सेन्सेक्समध्ये घसरण

Union Budget 2019 Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केलं. लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झालीय

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 02:39 PM IST

Union Budget 2019 : बजेटनंतर शेअर मार्केट गडगडलं, निफ्टी-सेन्सेक्समध्ये घसरण

मुंबई, 5 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केलं. लगेचंच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण झालीय. हे बजेट शेअर मार्केटसाठी अजिबातच चांगलं ठरलं नाही. बजेट दरम्यान निफ्टी 112 अंकांनी कमी होऊन 11834 अंकांवर आलाय. तर सेन्सेक्स 350 पेक्षा जास्त अंकांनी घसरण होऊन 39550च्या स्तरावर आलाय.निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीत घसरण सुरू आहे.

बँक निफ्टीत घसरण

बँकेच्या डिजिटल देवाण घेवाणीवर चार्ज लागू केल्यानं बँक निफ्टीत जोरदार घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टीत 64 अंकांची घसरण होऊन 31407 अंकांवर पोचलाय.

Union Budget 2019 : इलेक्ट्रिक कार घ्या; कर्जात सुट मिळवा !

सुरुवातीला वधारला होता बाजार

Loading...

सुरुवातीला शेअर बाजार सुरू झाला तो हिरव्या निशाणानं. सेन्सेक्सनं 100 अंकांची वाढ घेऊन 40 हजाराचा आकडा पार केला होता. निफ्टीमध्येही जवळजवळ 25 अंकांची वृद्धी झाली होती. पण बजेटमध्ये शेअर बाजाराला त्याच्या अनुकूल काही दिसलं नाही आणि तो गडगडला.

Union Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर

स्थिर सरकारमुळे विश्वास वाढला

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे देशात स्थिर सरकार असल्यानं परदेशी गुंचवणूकदारांचा विश्वास वाढलाय. पुढच्या पाच वर्षात FDI चा फ्लो चांगला राहू शकतो. मोदी सरकारनं त्यांच्या आधीच्या कार्यकाळात ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्या सरकार पूर्ण करू शकेल. त्यामुळे भारताची ग्रोथ जोरदार होईल.

Union Budget 2019 : विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक

सोन्याचे दर वाढले

दरम्यान, सोन्याच्या दरात देखील वाढ होणार आहे. सोन्यासह इतर मौल्यवान रत्नांवरची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. सोन्यावर सरकारनं 12 टक्के कस्टम ड्युटी केली आहे. त्यामुळे सोन्याचा किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.

Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही

Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता. होय, आता PAN Card नसल्यास Income Tax भरणं शक्य होणार आहे. Income Tax भरण्यासाठी आता PAN Card ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्याचे देखील आभार मानले.

Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...