मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रेल्वेने प्रवास करताना जास्तीचं सामान घेण्याआधी नियम समजून घ्या; अन्यथा दंड भरावा लागेल

रेल्वेने प्रवास करताना जास्तीचं सामान घेण्याआधी नियम समजून घ्या; अन्यथा दंड भरावा लागेल

 रेल्वेने प्रवासादरम्यान सामान नेण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक प्रवासी भरपूर सामान घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करतात. डब्याच्या आत गॅलरीत सामान ठेवल्याने इतर प्रवाशांना ये-जा करताना खूप त्रास होतो.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 31 मे : रेल्वेने प्रवास करत असाल आणि जास्त सामान नेलं तर ते तुम्हाला महागात पडणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त सामान रेल्वेतन (Indian Railway) नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. रेल्वेने नवीन नियम (Railway Rules) जारी केले आहेत. जर कोणाला जास्त सामान न्यायचे असेल तर त्याला पार्सल ऑफिसमधून सामान बुक करावे लागते. विहित मर्यादेपेक्षा जास्त मालाची ने-आण केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांना सामान बुक करावे लागेल देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. विमान प्रवासापेक्षा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवासी जास्त सामान घेऊन जातात. रेल्वेने प्रवासादरम्यान सामान नेण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक प्रवासी भरपूर सामान घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करतात. डब्याच्या आत गॅलरीत सामान ठेवल्याने इतर प्रवाशांना ये-जा करताना खूप त्रास होतो. अशा प्रवाशांना त्यांचे सामान बुक करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे. देशातील Cryptocurrency गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली, 2-3 महिन्यात सर्वकाही होईल स्पष्ट रेल्वे मंत्रालयाचे ट्वीट रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून लोकांना ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. अतिरिक्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. जर तुमच्याकडे जास्त सामान असेल तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामान बुक करा, असं रेल्वेने म्हटलं आहे. ट्रेनमध्ये किती सामान ठेवण्याची परवानगी रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवासी 40 ते 70 किलो सामान घेऊन जाऊ शकतो. विहित मर्यादेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन वेगळे ठरवण्यात आले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 40 किलो वजनाच्या सामानासह प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतो. तर एसी टू टायरमध्ये 50 किलो सामान सोबत नेले जाऊ शकते. फर्स्ट क्लास एसीबद्दल बोलायचे झाले तर त्यात 70 किलोपर्यंत सामान नेण्याची सूट आहे. होम लोन फेडण्यासाठी 'हा' पर्याय निवडा, लाखो रुपयांची बचत सहज शक्य होईल रेल्वे प्रवासादरम्यान काय नेण्यास मनाई? ट्रेन स्टॉपवर प्रवास करताना गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ऍसिड, दुर्गंधीयुक्त वस्तू, चामडे, वंगण, पॅकेजमध्ये आणलेले तूप ज्यामुळे इतर प्रवाशांचे नुकसान होऊ शकते अशा वस्तू बाळगणे देखील गुन्हा आहे.
First published:

Tags: Indian railway

पुढील बातम्या